रामकुंडावर मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन.. अमर रहे… अमर रहे… च्या घोषणा

नाशिकच्या रामकुंडावर राजकीय, शैक्षणिक, कलावंत, उद्योजक यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन करण्यात आले आहे. नाशिकच्या रामकुंडाला मोठे धार्मिक महत्व असल्याने विनायक मेटे यांच्या अस्थि कलशाचेही येथे विधिवत पूजा करत अस्थि कलश विसर्जन करण्यात आले आहे.

रामकुंडावर मेटेंच्या अस्थि कलशाचे विसर्जन.. अमर रहे... अमर रहे... च्या घोषणा
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 2:05 PM

नाशिक : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (VinayakMete) नुकतेच अपघाती निधन झाले होते. मराठा आरक्षण (Maratha Reservation) बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने जात असतांना मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थि कलशाची यात्रा दर्शनासाठी विविध जिल्ह्यात नेण्यात आली होती. त्यामुळे अस्थि कलशाचे विसर्जन झालेले नव्हते. ते आज नाशिकच्या रामकुंडावर करण्यात आलेय. 22 ऑगस्टला विनायक मेटे यांचा अस्थि कलश नाशिकमध्ये आणण्यात आला होता. मेटे यांच्या पत्नी, भाऊ, नातेवाईक यांच्यासह शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते अस्थि कलश विसर्जनावेळी उपस्थित होते.

विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती विनायक मेटे, रामहरी मेटे आणि परिवारातील सदस्य यांच्या हस्ते यावेळी अस्थि कलश पूजा करण्यात आली. डॉ. ज्योती मेटे (Dr.Jyoti Mete) नाशिकमध्ये महसूल विभागात सहनिबंधक या पदावर कार्यरत आहे.

मेटे यांचा नाशिक येथे कायम दौरा असल्याने कार्यकर्त्याचा ज्योती मेटे यांच्याशी ही परिचय होता. त्यांना सांत्वनपर भेट देण्यासाठी अनेक कार्यकर्ते रामकुंडावर उपस्थित होते. मात्र, यावेळी विनायक मेटे यांचे निकटवर्तीय अमित जाधव यांच्या निवासस्थानी पिंपळगाव खांब येथी ही सांत्वनपर भेट आयोजित केलेली आहे.

नाशिकच्या रामकुंडावर अस्थि कलश विसर्जन करण्याची परंपरा आहे. पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून अस्थि कलश विसर्जित केला जातो. धार्मिक परंपरेनुसार विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या निधनानंतर नाशिकच्या रामकुंडावर विविधीवत पूजा करत अस्थि कलश विसर्जन केले जाते.

यापूर्वी नाशिकच्या रामकुंडावर राजकीय, शैक्षणिक, कलावंत, उद्योजक यांच्या अस्थि कलशाचे विसर्जन करण्यात आले आहे. नाशिकच्या रामकुंडाला मोठे धार्मिक महत्व असल्याने विनायक मेटे यांच्या अस्थि कलशाचेही येथे विधिवत पूजा करत अस्थि कलश विसर्जन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.