AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार का? छगन भुजबळ म्हणाले..

Chhagan Bhujbal : "आता सतत आपण जायला लागलो, एखाद्याला मदत करायला लागलो तर कोणीतरी संस्थेवर घेतात. मोठा माणूस आहे, आपल्याला पदाचा फायदा होईल, मदत होईल म्हणून संस्थेवर घेतात"

Chhagan Bhujbal : रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार का? छगन भुजबळ म्हणाले..
Chhagan Bhujbal
| Updated on: Mar 21, 2026 | 11:47 AM
Share

“अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझ मत आहे. मंदिरं आहेत, ध्यानधारणा करा, योगा करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे गुरुजी आहेत. जे समाजाची सेवा करतात. पण अशा काही लोकांमुळे सगळेच एकजात बदनाम होतात” असं छगन भुजबळ भोंदूबाब अशोक खरात प्रकरणावर म्हणाले. “यांच्याकडे बरीच मोठमोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर पुण्याच्या त्यांना काय माहित? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेलं असेल. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्याच्या बाबतीत मला असं वाटतं की, काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आम्ही पुढारी आहोत. मंत्री जातात मग आपण जायला काय हरकत आहे?” असं छगन भुजबळ बोलले.

“ठीक आहे पोलीस आता चौकशी करतायत. त्यातून सत्य बाहेर येईल. त्यांनी आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस कारवाई करतील” असं छगन भुजबळ म्हणाले. अशोक खरात यांच्या संस्थांवर रुपाली चाकणकर होत्या. या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, “आता सतत आपण जायला लागलो, एखाद्याला मदत करायला लागलो तर कोणीतरी संस्थेवर घेतात. मोठा माणूस आहे, आपल्याला पदाचा फायदा होईल, मदत होईल म्हणून संस्थेवर घेतात”

महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार का?

रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्या पदावरुन सुद्धा हटवणार का? या प्रश्नावर सुद्धा छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. “महिला आयोग अध्यक्ष हे शासकीय पद आहे. आयोगाचा संबंध सरकारशी येतो. यात मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करुन उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असेल. आता महिला प्रदेशाध्यक्षपद या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाला आहे. त्यात शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं? हे पक्षश्रेष्ठी आणि सुनेत्राताई सर्व मंडळी बसून ठरवतील”

लगेच राजीनामा का घेतला नाही?

रुपाली चाकणकर यांचा लगेच राजीनामा घेतला नाही, यावरही छगन भुजबळ बोलले. “एखादा आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे हे समजून घेतलं पाहिजे. सुनेत्राताईंना आम्हाला अनेक काम असतात. त्यातून हे सर्व पहायचं असतं. सत्यता तपासल्याशिवाय राजीनामा घेणं योग्य ठरत नाही. माहिती घेतली असेल. चर्चा झाली असेल. हे महत्वाचं पद आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.