सुषमा अंधारे यांना हे आव्हान कुणाचं ? म्हणाले, तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजकारणातून

| Updated on: Apr 20, 2023 | 8:12 PM

खारघर येथील कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. उष्माघातामुळे आणि इतर गैरसोयींमुळे 100 लोकांचा बळी गेला असताना एक सदस्यीय समिती नेमली हे फडणवीस कोणत्या तोंडाने बोलत आहेत असा सवाल त्यांनी केला.

सुषमा अंधारे यांना हे आव्हान कुणाचं ? म्हणाले, तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजकारणातून
CM EKNATH SHINDE AND SUSHAMA ANDHARE
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेवरून राज्यसरकारवर टीका होत असतानाच आता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना नेत्यावर मोठा आरोप केला आहे. खारघर येथील कार्यक्रमात 100 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. उष्माघातामुळे आणि इतर गैरसोयींमुळे 100 लोकांचा बळी गेला असताना एक सदस्यीय समिती नेमली हे फडणवीस कोणत्या तोंडाने बोलत आहेत असा सवाल त्यांनी केला. तसेच, या कार्यक्रमासाठी सोईसुविधा देण्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले त्यावरही कारवाई करण्यात यावी. पण, त्या कंपनीमध्ये शिवसेना नेत्याची भागीदारी असल्यामुळे त्यावर कारवाई होणार नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थेट आव्हानच दिले आहे. सुषमा अंधारे यांनी कायम हिंदू देव देवतांच्या विटंबना केली. त्यांचे अध्यात्माशी काही देणे घेणे नाही. या प्रकरणात राजकारण करायचे म्हणून आपास्वारी, श्री सदस्य आणि आयोजक यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत असे म्हस्के म्हणाले.

हे सुद्धा वाचा

खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. लाईट अँड शेड या कंपनीला खारघर येथील काम देण्यात आले. त्या कंपनीत नरेश म्हस्के पार्टनर आहेत असे त्या म्हणतात. पण असे आरोप करताना सुषमाताई तुम्हाला ज्यांनी ही माहिती दिली त्यांनी एक तर तुम्हाला अडचणीत आणण्याकरिता दिलेली आहे किंवा तुम्हाला खोटी माहिती दिली आहे, असे ते म्हणाले.

नरेश म्हस्के याचा संबंध काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्यांनी तुम्हाला नरेश म्हस्केंवर आरोप करा असे सांगितले असेल. पण, त्यांना पवार साहेबांचा वाढदिवस, आणखी काही नेत्यांचे कार्यक्रम हे कुणी ते विचारा. आज ही तीच लाईट अँड शेड कंपनीच करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रमही हीच कंपनी करते. मराठी तरुणाची ही कंपनी असून तो मुलगा आहे. पण, यात नरेश म्हस्के याचा संबंध काय ?

नरेश म्हस्के यांचा संबंध असेल तर राष्ट्रवादी त्यांचे कार्यक्रम या कंपनीला का करायला देते ? सामनामधून शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करता पण तरीही त्यांची जाहिरात पहिल्या पानावर छापता तशी ही पद्धत आहे असे त्यांनी सांगितले.

24 तासांचा अवधी देतोय

सुषमाताई 24 तासाच्या आत माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करा अन्यथा राजीनामा द्या. ज्यांनी कोणी तुम्हाला आरोप करायला सांगितले त्यांनीही राजीनामा द्या. लाईट अँड शेड कंपनीसोबत माझा संबंध सिद्ध करून दाखवा मी तात्काळ राजकारणातून निवृत्त होईन. 24 तासांचा अवधी देतोय असा इशाराही म्हस्के यांनी सुषमा अंधारे यांना दिला.