AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Alert : मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका; रेड अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सूचना

मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, बीचवर पोहण्यास जातात आणि दुर्घटना घडतात.

Monsoon Alert : मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका; रेड अ‍ॅलर्टच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सूचना
मुंबईकरांनो सावधान, समुद्रकिनारी जाऊ नका
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 07, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई : कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर व उपनगरांत पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. हवामान खात्याने त्याबाबत रेड अ‍ॅलर्ट जारी केला असून सर्व नागरिकांना सतर्कतेच्या सूचनाही दिल्या आहेत. शहरात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या काळात समुद्रकिनारी बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्या अनुषंगाने मुंबईकरांना रेड अ‍ॅलर्ट (Red Alert) आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट (Orange Alert)च्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 याच वेळेत समुद्रकिनारी जाण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. इतर वेळी समुद्रकिनारी कुणीही फिरकू नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका प्रशासना (Municipal Administration)कडून देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनारी अनेक जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. सर्वच चौपाट्यांवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.

यंदा मान्सूनमध्ये आतापर्यंत 10 मृत्यूची नोंद

यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसांमध्येही वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात. तसेच, बीचवर पोहण्यास जातात आणि दुर्घटना घडतात. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे.

राज्यात पुढचे 4,5 दिवस मुसळधार-अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात पुढील दोन-तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत काल रात्रभर मुसळधार पाऊस

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह उपनगरातील बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात मुसळधार पाऊस पडला. अंधेरी सबवे, मालाड सबवे सह अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर दुसरीकडे मुंबईतील नदी-नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. (In Mumbai citizens are not allowed to go to the beach after 10 am on Red and Orange Alert Day)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच