
राज्यातील 29 महापालिका निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. 22 जानेवारी रोजी महापालिकेच्या महापाैर पदाची सोडत आहे. त्यानंतर आरक्षण स्पष्ट होईल. मात्र, 22 जानेवारी रोजी जरी सोडत असली तरीही महापाैर पदावरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळतंय. मुंबईसह काही महापालिकांवर महापाैर पदाच्या मुद्द्यावरून एकत्र लढलेल्या पक्षांचे संबंध ताणले आहेत. हेच नाही तर नगरसेवक फोडले जात असल्याने पक्षातील नेते अलर्ट मोडवर आहेत. महापाैर पदाकरिता सर्वच राजकीय पक्षांकडून दावे केली जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका महापाैर पदाच्या स्पर्धेत आपल्या सर्व 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले असून एकही नगरसेवक फुटणार नाही, याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली आहे.
फक्त मुंबई महापालिकाच नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकाच्या महापाैर पदावरूनही राजकारण रंगताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने आपली नगसेवक फोडली जाणार नाहीत, याची दक्षता घेत थेट अज्ञानस्थळी ठेवले आहे. मात्र, यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असलेल्या दोन नगरसेवकांना आता नोटीस पाठवण्यात आली. या दोन्ही नगरसेवकांवर शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई केली जाऊ शकते. पहिले अडीच वर्ष नक्की कोणाचा महापाैर होणार यावरून असूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात एकमत झाल्याचे बघायला मिळत नाही. त्यामध्येच आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले नगरसेवक फुटली जाणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. 22 जानेवारीला महापाैर पदासाठी सोडत सुटल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत महापाैर निवड होण्याचे संकेत आहेत. काही नगरसेवकांनी आताच महापाैर पदासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे. येत्या 30 जानेवारीपर्यंत महापाैर नक्की कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार हे सर्वच महापालिकांचे स्पष्ट होईल. सध्यातरी महापाैर पदासाठी चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे.