AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poster Contro : ‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवर उल्हासनगरात नाराजी, ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केला निषेध

काली चित्रपटाच्या पोस्टरबाबत ऑनलाईन नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे कॅनडामधील भारतीय दूतावसानेही या म्युझियमला प्रक्षोभक गोष्टींचा समावेश न करण्याची मागणी केली.

Poster Contro : 'काली' चित्रपटाच्या पोस्टरवर उल्हासनगरात नाराजी, ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केला निषेध
'काली' चित्रपटाच्या पोस्टरवर उल्हासनगरात नाराजीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 1:32 AM
Share

उल्हासनगर : काली (Kali) चित्रपटाच्या पोस्टरवरून संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरातही ब्राह्मण समाज (Brahmin Society) आणि तृतीयपंथीयां (Transgender)मध्येही नाराजी पसरली आहे. हा चित्रपट तयार करणाऱ्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी केली आहे. भारतीय वंशाच्या फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी कॅनडामधील टोरंटो शहरात असलेल्या आगा खान म्युझियममध्ये ‘रिद्म्स ऑफ कॅनडा’ या सेगमेंटमध्ये ‘काली’ चित्रपटाचं पोस्टर लॉन्च केलं. या पोस्टरमध्ये काली माता एका हाताने सिगरेट पिताना, तर दुसऱ्या हातात एलजीबीटी कम्युनिटीचा झेंडा घेतलेली दाखवली आहे. यावर ब्राम्हण समाज आणि तृतीयपंथीयांमधून तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.

लीना मणीमेकलाई यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

काली चित्रपटाच्या पोस्टरबाबत ऑनलाईन नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर भारतात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत लीना मणीमेकलाई यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. तर दुसरीकडे कॅनडामधील भारतीय दूतावसानेही या म्युझियमला प्रक्षोभक गोष्टींचा समावेश न करण्याची मागणी केली. एकीकडे कॅनडात या घडामोडी सुरू असतानाच उल्हासनगरात ब्राह्मण समाज आणि तृतीयपंथीयांनी एकत्र येत लीना मणीमेकलाई यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलं. यामध्ये लीना मणीमेकलाई विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लीना मणीमेकलाई यांच्याकडून ट्विटरवर स्पष्टीकरण

दरम्यान, हा गदारोळ पाहून फिल्ममेकर लीना मणीमेकलाई यांनी याबाबत ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. हा चित्रपट एक दिवस काली माता टोरंटो शहराच्या रस्त्यावर अवतरते आणि त्यानंतर तिच्या आजूबाजूला काय गोष्टी घडतात यावर अवलंबून आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यानंतरही ट्विटरवर अरेस्ट लीना मणीमेकलाई नावाचा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. (In Ulhasnagar, Brahmin community and third parties protest over Kali movie poster)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.