धाकधूक पुन्हा वाढली, कृष्णेची पातळी उंचावल्याने सतर्कतेचा इशारा

पश्चिम महाराष्ट्रात आत्ता कुठं पुराने (Flood) उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सांगली भागातील (Sangli) नागरिकांची धाकधूक वाढली आहे.

Krishna River High alert in Sangli, धाकधूक पुन्हा वाढली, कृष्णेची पातळी उंचावल्याने सतर्कतेचा इशारा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात आत्ता कुठं पुराने (Flood) उद्ध्वस्त केलेले संसार सावरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सांगली भागातील (Sangli Flood) नागरिकांची धाकधूक वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीकाठच्या (Krishna River) नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कोयना धरणातून (Koyna Dam) सध्या 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पुढील 2 दिवस हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास सांगलीत पाण्याची पातळी वाढणार आहे. आयर्विन पुलाजवळ सध्या 10 फूट 6 इंच पाणी पातळी आहे. हा विसर्ग असाच सुरू राहिल्यास ती पाणी तापळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे.

आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट, तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले, तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जावू नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी अलमट्टी धरणातून 1 लाख विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवण्यात आल्याचंही नमूद केलं. त्यामुळे मागील वेळी समन्वयाच्या अभावामुळे तयार झालेली पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *