AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो थर्टीफस्ट साजरा करतायेत? पण जरा जपून…, पोलिसांची असणार करडी नजर

नव्या वर्षाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र नव वर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईकरांनो थर्टीफस्ट साजरा करतायेत? पण जरा जपून..., पोलिसांची असणार करडी नजर
| Updated on: Dec 30, 2024 | 7:27 PM
Share

नव्या वर्षाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र नव वर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे. थर्टीफस्ट कसा साजरा करायचा? कुठे करायचा याचं प्लॅनिंग आधीपासूनच अनेकांनी बनवून ठेवलं आहे. मात्र थर्टीफस्ट म्हटलं की पोलिसांसमोरील आव्हानं देखील वाढतात. थर्टीफस्ट सेलिब्रेशनच्या उत्साहाच्या भरात अनेकदा काही गुन्हेगारी घटना देखील घडतात, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे या काळात अपघातांची संख्या देखील मोठी असते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याबाबत जॉइंट कमिश्नर सत्यनारायण चौधरी यांनी माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.   त्यासाठी आठ ॲडिशनल सीपी, 30 डीसीपी, 2100 अधिकारी, 12000 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि या व्यतिरिक्त  स्पेशलिस्ट टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.  चौपाटी असतील हॉटेल असेल या ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.

एवढचं नव्हे तर  8000 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे. कोस्टल एरियामध्ये पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.  यासाठी  400 पेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल आणि साडेतीनशे पेक्षा जास्त बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत.  कोणालाही मदतची गरज लागली तर त्या ठिकाणी आपण तातडीनं मदत पाठवू अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

जेवढे रेकॉर्डवरील आरोपी आहेत, त्यांची चेकिंग सिस्टम आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ही करण्यात येत आहे. पोलिसांसोबतच ट्रॅफिक पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली आहे.  नागरिकांना कुठे गरज लागली तर त्यांनी पोलिसांशी संर्पक साधावा. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या हॉटेलसोबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे

जास्त अंधार असेल त्या ठिकाणी बीएमसीला सांगून लाईटची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना देखील महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तैनात करण्यात आलेलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे, असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.