AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश

मोठी बातमी समोर येत आहे, आणखी एक नेता आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला 'तो' नेता करणार शिवसेनेत प्रवेश
dcm pawar and shinde
| Updated on: Feb 26, 2025 | 6:19 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. मात्र त्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या. तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागाच मिळाल्या, त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. विशेत: शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश होत आहे. याचा सर्वात मोठा धक्का हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तर आता दुसरीकडे मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शरद सोनवणे हे जुन्नरचे अपक्ष आमदार आहेत. ते 28 फेब्रुवारी रोजी नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली. शरद सोनवणे यांच्या या निर्णयामुळे जुन्नर मतदारसंघात अजित पवार आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. या अटितटिच्या लढतीमध्ये शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके याचा पराभव केला. दरम्यान शरद सोनवणे यांनी महायुतीत असताना राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा  शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं शिरुर मतदारसंघात शिवसेनेचं नेतृत्व नव्हतं. आता शरद सोनवने हे आढळराव पाटलांची जागा घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.