Sanjay Raut: मोठी बातमी! INDIA आघाडीच्या मोर्चात संजय राऊतांना भोवळ, अपडेट काय?

INDIA Bloc Protest: एक मोठी बातमी समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील मोर्चात उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांना भोवळ आली. दिल्लीत उन्हाचा पार अधिक आहे. त्याचा फटका त्यांना बसला.

Sanjay Raut: मोठी बातमी! INDIA आघाडीच्या मोर्चात संजय राऊतांना भोवळ, अपडेट काय?
मोर्चात संजय राऊतांना भोवळ
| Updated on: Oct 06, 2026 | 1:41 PM

Sanjay Raut : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी INDIA आघाडीने दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. इंडिया आघाडीतील 19 घटक पक्षातील खासदारांनी संसद ते केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय असा मोर्चा काढला. खासदारांनी तीन किलोमीटरचे अंतर पायी कापले. अंगाची लाही लाही करणारे ऊन असताना आकाशवाणी भवनाच्या गेट क्रमांक 3 वर विरोधी गोटातील खासदारांनी ठिय्या आंदोलन दिले. त्याचा फटका उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांना बसला. या ऊन्हाचा त्यांना त्रास झाला. त्यांना यामुळे भोवळ आली. ऊन्हामुळे त्यांना चक्कर आली.

संजय राऊतांना मोर्चात चक्कर

Loading...

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत विरोधकांचे मोठे आंदोलन सुरू आहे. त्यात अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते सहभागी झालेले आहेत. आंदोलनादरम्यान या नेत्यांना उन्हाचा तीव्र त्रास झाला. हा त्रास असह्य झाल्याने संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना भोवळ आली. त्यांना तातडीने सावलीत नेण्यात आले. उन्हाच्या त्रासामुळे त्यांना चक्कर आल्याची माहिती समोर आली आहे.

आता राजीनामा देण्याची वेळ

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीने आज मोर्चा उघडला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी धरणे आंदोलन सुरू केले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी आता राजीनामा देण्याची वेळ आली आहे, असे ठणकावले. दरम्यान पोलीस आणि नेत्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली. कार्यकर्त्यांनी यावेळी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी अनेक खासदार, नेत्यांनात ताब्यात घेतले.

आकाशवाणी भवन परिसरात एक तासापासून ठिय्या

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आकाशवाणी भवन परिसरात एका झाडाखाली बसलेले आहेत. गेल्या तासाभरापासून त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिथे दिपेंद्र हुड्डा हे सुद्ध आहेत. हे सर्व नेते निवडणूक आयोग्याच्या मुख्यालयात जाण्याची आग्रही मागणी करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल, चरणजीत सिंह चन्नी आणि इतर नेते सुद्धा उपस्थित आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us