Mumbai Red Alert : मुंबईत भरदिवसा काळोख… पुढचे 4 तास अतिधोक्याचे, प्रशासनाच्या इशाऱ्याने धाकधूक; पावसाचा जोर वाढला
Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची आहेत. पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र फक्त आणि फक्त पाणीच बघायला मिळत आहे. प्रशासनाकडून मोठा आवाहन करण्यात आले.

मुंबईमधील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय. काल रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळी पावसाचा जोर वाढलाय. सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. मुंबईच्या लोकल गाड्यांवर त्याचा थेट परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जातंय. काही हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलीत. पूर्ण मुंबईच जलमय झालीये. मुंबईत पुढील 12 ते 14 तास पावसाचे संकेत आहेत. शिवाय पुढील 4 तास अतिधोक्याचे असल्याचे सांगितले जात आहे. पूर्ण ढग दाटून आले असून दिवसा काळोखा होतोय.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. शाळा आणि महाविद्यालयांसोबतच खासगी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होम देण्याचेही सांगण्यात आलंय. मुंबईमधील दादर स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक लोक गाड्या या अडकून पडल्याचेही चित्र बघायला मिळतंय. मुंबईत धुवाधार पाऊस आहे.
वसई विरार, नालासोपारा येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. महापालिका आणि पोलिस प्रशासन सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेऊ आहे. हिंदमाता परिसरात नुकताच तूफान पावसाला सुरूवात झालीये. पूर्ण मुंबईतच पावसाचा जोर वाढल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. हेच नाही तर पुराच्या पाण्यात ठाण्यात चक्क चाप दिसून आलाय. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
मुंबईकरांसाठी पुढील 4 तास अत्यंत महत्वाची असणार आहेत. वडाळा रेल्वे स्थानकात पूर्ण पाणी साचले असून रेल्वेचे रूळ अजिबात दिसत नाहीत. अनेक लोक रेल्वेमध्ये अडकून पडली आहेत. दादर रेल्वे स्थानकात देखील प्रवाशांची मोठी गर्दी झालीये. कुर्ला ते सायन भागात रूळावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रेल्वे रूळावर उतरून चालण्यास रेल्वे प्रशासनाकडून मनाई करण्यात आलीये. मात्र, लोक तरीही रूळावरून चालताना दिसत आहेत. कुर्लामध्ये लोक थांबला असून लोक रूळावरून चालत पुढे निघाले आहेत.
