AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गारपिटीचे मोठे संकट, ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे, मोठा इशारा, 10 जिल्हे..

Weather Update : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो. गारपिटीची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे.

गारपिटीचे मोठे संकट, ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे, मोठा इशारा, 10 जिल्हे..
Hailstorm
| Updated on: Aug 09, 2026 | 6:59 AM
Share

राज्यात पाऊस कमी अधिक होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज होता. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. राजस्थानच्या अनुपगढपासून दिल्ली, सिंधी ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोदिंया, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

यासोबतच काही भागात 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. यासोबतच जोरदार पाऊसही असेल. मात्र, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे पडू शकतात. गारपिटीचा इशारा देण्यात आला. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पाऊस चांगलाच कोसळताना दिसत आहे. त्याच आजही मोठा इशारा देण्यात आला.

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जायकवाडी धरणातील भरलेल्या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि उद्योगावरील संकट आता पूर्णत टळले आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना