AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, 24 जिल्ह्यांमध्ये इशारा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, थेट..

Rain Update : भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला.

Rain Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, 24 जिल्ह्यांमध्ये इशारा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, थेट..
Rain Update
| Updated on: Jun 26, 2026 | 7:24 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. केरळमध्ये 2 दिवस पाऊस उशीरा दाखल झाला. त्यानंतर तब्बल 15 दिवस मॉन्सून अरबी समुद्रातच होता. पुढे मॉन्सूनची वाटचाल होत नव्हती. त्यामध्येच पेरण्या रखडल्या होत्या. यंदा राज्यात उशीरा पाऊस दाखल झाला असला तरीही दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज राज्यातील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. 1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला. ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.

उद्या पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. जळगावातील अंजनविहिरे गावातील झीरी नदीला पहिल्याच पावसात पूर आला असून नदीवरील बंधारा ओव्हरप्लो झाला आहे. अंजन विहिरेसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या छोट्या नाल्यांना पूर आल्याने झीरी नदीला पूर आला असून बंधारा ओव्हरप्लो झाला आहे.

नदीला पूर आल्याने परिसरातील शेतामधील कोरड्यात झालेल्या बोरवेल तसेच विहिरींना देखील पाणी आल्याचे जलस्त्रोत जिवंत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जून अखेर नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 11.4 मिमी पाऊस. अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक 33.4 मिमी पावसाची नोंद. नंदुरबार तालुक्यात 17.1 मिमी पाऊस झाला.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण