AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची…

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा हा देण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसतोय. पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामध्ये आता आज देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सावधान! भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची...
Rain
| Updated on: Sep 05, 2025 | 7:53 AM
Share

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील काही भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. पंजाब, दिल्ली आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडताना दिसतोय. आज देखील भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण उत्तर, महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मराठवाड्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काल मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस बघायला मिळाला.

रात्री पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात आज पाऊस होऊ शकतो. पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, रहियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मीर या भागात मोठया प्रमाणात पाऊस हा पडताना दिसत असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक धरण भरून वाहत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा तसेच औद्योगिक वसाहतींचा वर्षभराची चिंता मिटली आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांना गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आठ तालुक्यातील 175 गावांची सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची तहान या धरणातून भागवले जाते. गिरणा धरणात 96% पेक्षा जास्त जलसाठा शिल्लक आहे.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. गिरणा नदीपात्रात गिरणा व मन्याड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गिरणा धरणातून 814 क्यूसेक्स व मन्याड धरणातून 417 क्यूसेक्सने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्याने गिरणा नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल