IMD weather update : राज्यभरात थंडीचा कडाका, गारठा वाढणार, मोठा इशारा, पुढील..

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका बघायला मिळत आहे. थंडी चांगलीच वाढली आहे. त्यामध्येच भारती हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

IMD weather update : राज्यभरात थंडीचा कडाका, गारठा वाढणार, मोठा इशारा, पुढील..
IMD weather
| Updated on: Dec 15, 2025 | 7:30 AM

राज्यासह देशात कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे गारठा वाढल्याने राज्यात शीत लहरी येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला राज्यात पाऊस होता. ऐन दिवाळीमध्येही पाऊस पडत होता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात गुलाबी थंडी सुरू झाली. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा अत्यंत मोठा इशारा जारी केला. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळात झाली. धुळ्यात 6 अंश सेल्सिअस तापमान होते. धुळ्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. जेऊर आणि निफाडमध्ये पारा घसरला. 6 च्या आसपास तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडे थंडी वाढत असल्याने राज्यातही थंडी वाढली आहे. मालेगाव, आहिल्यानगर, गोदिंया येथे 9 अंश सेल्सिअस तापमान होते. पुणे, जळगाव, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे 10 अंश सेल्सिअस तापमान होते.

मुंबईतही पहाटे थंडी वाढली आहे. 15 अंशांच्या आपसास तापमानाची नोंद झाली. 31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईची हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. धूळ, धुके आणि धुरामुळे श्वास कठीण झाले आहे. नरिमन पॉईंट परिसरात धूसर वातावरण आहे. लांबच्या टॉवर्स, इमारती आणि समुद्राचे दृश्य अस्पष्ट दिसत आहे.

हवेत तयार झालेल्या धुरक्यामुळे हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे. वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खोकला, सर्दी, दम्याचे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसन आजाराने ग्रस्त रुग्ण अधिक त्रस्त. मात्र हवेत गारठा असल्याने नरिमन पॉईंट परिसरात मॉर्निंग व करणाऱ्या मुंबईकरांची गर्दी बघायला मिळते.

महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपाययोजना करत असले तरी अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी असणारच आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये गारठा वाढणार असल्याने आरोग्याची काळजी घेणे महत्नाचे आहे.