उन्हाचा चटका अधिक तीव्र, भारतीय हवामान विभागाचा या भागात थेट येलो अलर्ट, दुपारी 1 नंतर…

राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी उकाडा तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यातील काही भागात येलो अलर्ट जारी केला आहे.

उन्हाचा चटका अधिक तीव्र, भारतीय हवामान विभागाचा या भागात थेट येलो अलर्ट, दुपारी 1 नंतर...
Heat alert
| Updated on: Mar 04, 2026 | 7:21 AM

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता राज्यात उष्णता वाढत आहे. देशातील उंच्चाकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. अकोला येथे 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईसह कोकणातही उष्णता आणि दमट वातावरण बघायला मिळाले. भारतीय हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट राज्यातील काही भागात दिला. मागच्या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. गारठा काही प्रमाणात जाणवत होता. मात्र, आता कडाक्याचे उष्णता बघायला मिळत आहे. दुपारच्या वेळी उन्ह अधिक जाणवत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात थंडी झाली. नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. मात्र, देशातील काही राज्यात अजूनही जोरदार पाऊस बघायला मिळतोय. काही राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये.

सलग दोन दिवस कमाल तापमान 35 पार पुण्यात झाले. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात तापमान वाढीमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस कमाल तापमानाने 35 शी ओलांडली असून पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे.

गेल्या काही दिवसांत सातत्याने तापमानात वाढ होत आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. अयोध्येत 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील नीचांकी तापमान धुळ्यात नोंदवले गेले. धुळे येथे 12.8 अंश तापमान होते.

अमरावती, वर्धी येथेही 35 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाल वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, कोकण आणि रायगड येथे दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. या भागात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. अतिमहत्वाचे काम नसल्याशिवाय दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us