AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा

Maharashtra Rain Update : मागील काही दिवस पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा हा देण्यात आलाय. देशातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीये.

4 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोठं संकट, भारतीय हवामान विभागाचा अत्यंत मोठा इशारा
heavy rains
| Updated on: Sep 04, 2025 | 7:59 AM
Share

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती.आता पुढचे तीन दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. फक्त महाराष्ट्राच नाही तर देशभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशभरात पाऊस कोसळतोय. देशातील अनेक भागात पूर आले असून नद्यांनी धोकादायक स्थिती ओलांडली आहे.

हवामान तज्ज्ञांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हांना मुळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मात्र, आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाच्या पावसाचा अंदात वर्तवण्यात आलाय. उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. उद्या आणि परवा राज्यासह देशात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालंय. शेतकरी राजा चिंतेत आहे. राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. देशात पावसाचे संकट आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. जायकवाडी धरणातून दोन महिन्यात 25 टीएमसी विसर्ग, आतापर्यंत 3 वेळा पाणी सोडण्यात आले. धरण क्षेत्रात पाण्याची सातत्याने आवक असल्याने सद्यस्थितीला धरणाचा साठा 99% वर गेलीये.

पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि औद्योगिक वसाहतींची चिंता मिटली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळा संपण्यापूर्वीच शंभर टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून तब्बल 25 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात तीन वेळा जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नांदेडमध्ये दोन वेळा गोदावरी नदीला पूर देखील आला होता.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी