AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 48 तास सर्वाधिक धोका, मोठा इशारा, यंत्रणा अलर्ट मोडवर, अतिमहत्वाच्या कामाशिवाय..

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला असून पुढील काही तास धोक्याची असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालीये.

पुढील 48 तास सर्वाधिक धोका, मोठा इशारा, यंत्रणा अलर्ट मोडवर, अतिमहत्वाच्या कामाशिवाय..
Heavy rain
| Updated on: Sep 28, 2025 | 1:09 PM
Share

राज्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतांचे रूपांतर तळ्यात झालंय. पूर्ण पिक वाहून गेले. पुरामध्ये शेतीमधील पिकच नाही तर धान्य कपडे आणि संसार वाहून गेला. शेतकऱ्यांचा हातात काहीच शिल्लक राहिले नाही. आभाळ फाटल्यासारखा पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात पावसाचा मोठा फटका बसलाय. सरकारने मदत जाहीर केली असून यंत्रणा काम करत आहेत. मात्र, हा पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुढील काही तास अजूनही धोक्याची असणार आहेत. उद्यापर्यंत संकट राज्यावर असणारच आहे.

आता भारतीय हवामान विभागाकडून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची असणार आहेत. येणाऱ्या 24 तासात मराठवाड्यातील पाऊस कमी होईल. मात्र, पाऊस पूर्ण बंद होणार नसल्याचे स्पष्ट हवामान विभागाने सांगितले. पावसाचा जोर अजूनही मराठवाड्यात बघायला मिळतोय. पाणी पातळीत सतत वाढत होताना दिसत आहे.

मराठवाड्यात नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे हवामान विभागाकडून देण्यात आलाय. राज्यात एवढ्या मोठया प्रमाणात पाऊस पडण्याचे कारणही हवामान शास्त्रज्ञ एस. डी सानप यांनी सांगितला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पुढील 48 तास राहणार आहे. मराठवाड्यातील नद्या, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय. यासोबतच या संकटाच्या काळात खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करण्यात आलीये. धान्य किटचे वाटप देखील सुरू आहे. जालन्यातील सोमनाथ परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरिपातील सोयाबीन कपाशी पिकांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनला शेतातच कोंब फुटण्याची शेतकऱ्यांना भीती. पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शेतकरी मागणी करताना सध्या दिसत आहेत. राज्यातील यंत्रणेचे सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?