AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटांचा कहर! 30 ते 31 ऑगस्ट धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Rain Update : मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. मात्र, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अजूनही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.

संकटांचा कहर! 30 ते 31 ऑगस्ट धोक्याची, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
| Updated on: Aug 30, 2025 | 8:50 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. पावसाने थैमान घातले आहे. काही भागात अतिवृष्टी झालीये. मराठवाड्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतांचे मोठे नुकसान झाले असून पिक वाहून गेली आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्हात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. काही गावांचा संपर्क देखील काल तुटला. सततच्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. कोकण, मराठवाडा, मुंबई आणि विदर्भात आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय. देशात पावसाचा हाहाकार सुरू आहे. आज काही भागात ऑरेंज अलर्ट जार करण्यात आलाय. 30 ते 31 ऑगस्टदरम्यान देशभरात अतिमुळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी काही प्रमाणात पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले. कालही पाऊस होता. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पुण्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भातही पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 पैकी 9 दरवाजे उघडले. वर्धा नदीत सोडला पाण्याचा विसर्ग.

यवतमाळ, अमरावती, वर्धा,चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकाना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. सध्या अप्पर वर्धा धरणात 92 टक्के इतका जलसाठा आहे. सततच्या पावसामुळे हे मोठं धरण भरले आहे. चाळीसगावात मुसळधार पावसानंतर गिरणा धरण 90 टक्क्यांवर मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले. चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्ध्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे गिरणा धरण 90 टक्के भरले. मन्याड, वलठाण, कोदगाव, हातगाव असे एकूण सात प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.

पश्चिम विदर्भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांतील तब्बल 6.08 लाख हेक्टरवरील तूर, कपाशी, सोयाबीन, संत्रा व भाजीपाला पिके पाण्यात. फक्त ऑगस्ट महिन्यातच 4.58 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. जूनमधील अतिवृष्टीत 1,08,913 शेतकऱ्यांचे 98,209 हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त. कृषी सहसंचालक कार्यालयाचा अहवाल सादर. एनडीआरएफ निकषानुसार 88.23 कोटींची भरपाईची मागणी शासनाकडे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.