AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढील 24 तास धोक्याची, अवकाळी पावसाचा कहर, थेट..

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आजही अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढील 24 तास धोक्याची, अवकाळी पावसाचा कहर, थेट..
Rain
| Updated on: May 11, 2026 | 7:24 AM
Share

राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. उष्णतेसोबतच पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. एप्रिल महिन्यापासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यात उष्णता प्रचंड वाढली. जवळपास जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामध्येच आता उष्णतेपासून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. कोकणात आज दमट आणि उष्णतेचा इशारा देण्यात आला. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. जळगाव यथे 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला आणि मालेगाव येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तापमानामध्ये सातत्याने घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा तापमानाने उच्चांक गाठला असूनकमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी पिणे तसेच उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मान्सूनची आनंदवार्ता अंदमानात लवकर आगमन होणार आहे. तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र.  उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे मुंबईसह राज्यभरातील नागरिक हैराण झाले आहेत.  याचदरम्यान ‘स्कायमेट’ने मान्सूनच्या सक्रियतेबाबत भाकीत केले आहे. अंदमानात निर्धारित कालावधीत मान्सून दाखल होईल.

येत्या दोन दिवसांतच म्हणजे 12 आणि 13 मेदरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. यापूर्वी 14 ते 22 मेदरम्यान मान्सून अंदमानात पोहोचण्याचा अंदाज होता. ती वेळ आणखी जवळ आल्याचे ‘स्कायमेट’ने नव्या अंदाजाद्वारे म्हटले आहे

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?