AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mock Drill: मॉक ड्रिल म्हणजे काय? ऑल-आउट वॉर स्थितीत काय करावं? सोप्या भाषेत घ्या समजून

आजच्या काळात, जेव्हा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते, तेव्हा आधीच तयारी करणे खूप महत्वाचे झाले आहे. मॉक ड्रिलद्वारे प्रशासन काही गोष्टींची तपासणी करते ,

Mock Drill: मॉक ड्रिल म्हणजे काय? ऑल-आउट वॉर स्थितीत काय करावं? सोप्या भाषेत घ्या समजून
मॉक ड्रील म्हणजे काय ?Image Credit source: social media
| Updated on: May 06, 2025 | 11:57 AM
Share

What is Mock Drill: जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून, गृह मंत्रालयाने उद्या, अर्थात 7 मे रोजी अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रील म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या आहेत. या काळात, विद्यार्थी आणि नागरी संरक्षणाशी संबंधित लोकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मॉक ड्रिल हा केवळ एक अभ्यास नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉक ड्रिल ही युद्ध किंवा आपत्तीसारख्या कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीपूर्वी केलेली तयारी असते.

“ऑल-आउट वॉर परिस्थितीत मॉक ड्रिल आवश्यक”

संरक्षण तज्ञ आणि निवृत्त मेजर जनरल केके सिन्हा म्हणाले की, मॉक ड्रिल हे सहसा ऑल-आउट वॉर म्हणजेच संपूर्ण युद्ध किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाची शक्यता लक्षात घेऊन आयोजित केल्या जातात.” 1971 च्या युद्धादरम्यान असा सराव झाला होता. कारगिल दरम्यान असे मॉकड्रील झाले नाही. कारण आपल्याला ते फक्त मर्यादित क्षेत्रापुरते मर्यादित ठेवायचे आहे. 1990 च्या युद्धातही असा मॉक ड्रील झालं नव्हतं ” असं ते म्हणाले.

परदेशातही होते युद्धाची तयारी

मेजर जनरल सिन्हा म्हणाले की, युरोपीय देशांमध्ये, विशेषतः स्वीडन आणि फिनलंडसारख्या देशांमध्ये जिथे युद्धाचा धोका नाही, तिथे अणु हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तयारी केली जाते. लोक अंडरग्राऊड (भूमिगत) बंकर बांधत आहेत. राजस्थानसारख्या भारतातील काही भागात पाण्याचे कालवे देखील युद्धादरम्यान सैनिकांसाठी धोरणात्मकदृष्ट्या उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी नमूद केलं.

मॉक ड्रिल बद्दल 5 महत्त्वाचे मुद्दे:

1. हवाई हल्ल्याच्या सायरनची तपासणी आणि जागरूकता.

2. हल्ला झाल्यास नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क करणे.

3. हवाई हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउटचा म्हणजे दिवे बंद करण्याचा सराव.

4. शत्रूच्या विमानांपासून संरक्षण करण्यासाठी यंत्र झाकण्याचे आणि लपवण्याचे प्रशिक्षण.

5. हल्ल्याची संभाव्य ठिकाणे रिकामी करण्यासाठी सराव.

मॉक ड्रिल का आवश्यक ?

आजच्या काळात, जेव्हा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते, तेव्हा आधीच तयारी करणे खूप महत्वाचे झाले आहे. मॉक ड्रिलद्वारे प्रशासन काही गोष्टींची तपासणी करते , त्या खालीलप्रमाणे –

– धोक्याच्या परिस्थितीत सामान्य लोक कसे वागतील ?

– सुरक्षा आणि बचाव पथके किती जलद प्रतिसाद देत आहेत

– विद्यमान सुरक्षा साधने आणि अलर्ट सिस्टम किती प्रभावी आहेत ?

– काय सुधारणा करणे आवश्यक आहे ?

मॉक ड्रिल कसं होतं ?

– पूर्वनिर्धारित वेळी अलार्म वाजवला जातो किंवा सूचना दिली जाते.

– लोकांना परिस्थिती काय आहे ते सांगितले जाते, उदा -आग, बॉम्बचा धोका किंवा भूकंप

– सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले जाते.

– अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचतात.

– संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करून त्यात किती वेळ लागला, कोणत्या कमतरता होत्या आणि काय सुधारणा करता येईल, ते पाहिले जाते.

उदाहरणाद्वारे समजून घ्या मॉक ड्रिल

शाळेतील भूकंप मॉक ड्रिल : अलार्म वाजताच, मुले ताबडतोब डेस्कखाली लपतात अथवा मोकळ्या मैदानात जमतात.

ऑफीसमध्ये अग्निशामक मॉक ड्रिल : कर्मचाऱ्यांना आपत्कालीन एक्झिटमधून बाहेर पडण्याचा सराव करायला लावला जातो.

मॉल किंवा स्टेशनवर दहशतवादी हल्ल्याचा मॉक ड्रिल : सुरक्षा कर्मचारी अचानक गोळीबार झाल्याची माहिती देतात, त्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सराव केला जातो.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.