भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आणखी वेगाने धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

जगभरात ऊर्जा संकट असतानाही भारताने ७.८ रेटने ग्रो केला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीकेसीतील 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'मध्ये उद्योजकासमोर बोलताना केले आहे.

भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आणखी वेगाने धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
pm modi
| Updated on: Sep 08, 2026 | 8:23 PM

जगभरात आखाती युद्धामुळे अनिश्चितेतमुळे वातावरण असताना, ऊर्जा आणि कमोडिटी पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला असताना एप्रिल ते जूनचा क्वार्टर सर्वात आव्हानात्क असताना भारत ७.८ रेटने ग्रो करतो. तेव्हा जग देखील आश्चर्यचकीत होते.अलिकडे जपानच्या क्रेडिंग रेटिंग एजन्सीने भारताच्या सॉवरेन क्रेडिट रेटिंगला ‘ए’ क्रेडिट रेटिंगला अपग्रेट केले आहे. ग्रोथ मोमेंटम आणि आपली मायक्रो इकॉनॉमी स्टॅबिलीटी आणि जे स्ट्रक्चरल रिफॉर्म गेल्या वर्षात केले आहेत.त्या सर्वाबद्दल जग इतके आश्वस्त आहे की त्यामुळे भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आता आणखी वेगाने धावणार आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. मुंबईतील बीकेसी येथे ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत होते.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की,’ फिनटेक स्टोरी अद्भूत राहिली आहे. आणि याचा सर्वात मोठा चॅम्पियन आहे आपला युपीआय. याची चर्चा मी गेल्यावर्षी याची केली होती. ही इतके मोठे ट्रान्सफॉर्मेशन आहे की जेव्हा फिनटेकची चर्चा होईल ती युपीआय शिवाय होणार नाही. आता काही दिवसांपूर्वी युपीआयने २५ वर्षे पुर्ण झाली. दहा वर्षापूर्वी सांगायचो की तुमचे बँक तुमच्या फिंगर टीपवरील येईल. तेव्हा काही लोकांनी हे अशक्य वाटत होते. मी वेल इन्फॉम लोकांबद्दल बोलत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ज्या लोकांच्या अनेक पिढ्यांनी बँकचा दरवाजाही पाहिली नव्हता.ते लोक आता बँकेशी जोडलेले आहेत. आज ऑगस्टमध्ये २४०० कोटीहून अधिक व्यवहार युपीआयमधून झाले आहेत. आपण येथे बसलोय तेथे दहा मिनिटांत ५० लाख हून अधिक युपीआय पेमंट झाले असतील असेही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us