Numerology : कठीण परिस्थितीतही जोडीदाराची साथ सोडत नाहीत हे लोक; तुमचा मूलांक आहे का यात ?
अंकशास्त्रानुसार, काही मूलांक असलेले लोक कठीण प्रसंगात जोडीदाराचा हात कधीच सोडत नाहीत. ते केवळ भावनिक आधार देत नाहीत, तर समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतात. तुमचा मूलांक आहे का यात ?

न्यूमरॉलॉजीनुसार (Numerology) ज्या तारखेला तुमचा जन्म होतो, त्या अंकाची बेरीज म्हणजे तुमचा मूलांक. एखादं नातं खरं आहे की केवळ सुखाच्या काळापुरतं आहे, याची खरी परीक्षा कठीण प्रसंगातच होते. अंकशास्त्रानुसार काही विशिष्ट मूलांक असलेले लोक आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखात कायम खंबीरपणे उभे राहतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते जोडीदाराचा हात सोडत नाहीत. असे लोक केवळ भावनिक आधार देत नाहीत, तर अडचणीच्या काळात समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतात. चला, जाणून घेऊया कोणते मूलांक असलेले लोक आपल्या जोडीदाराला आयुष्यभर साथ देतात.
चला जाणून घेऊया असे लोक कोण ?
मूलांक 2 – ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. हे लोक स्वभावाने भावनिक, संवेदनशील आणि काळजी घेणारे असतात.जोडीदार अडचणीत असताना हे लोक त्यांना मानसिक आधार देतात. कठीण काळात त्यांची साध कधीच सोडत नाहीत.
मूलांक 4 – अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. हे लोक राहूच्या प्रभावाखाली असतात आणि विशेष म्हणजे ते कठीण परिस्थितीला घाबरत नाहीत. ते केवळ जोडीदाराला धीर देत नाहीत, तर प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यासाठी स्वतःच प्रयत्न करतात.
मूलांक 6 – 6 हा मूलांक असलेले लोकंही याच कॅटॅगरीत असतात. त्यांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. अंकशास्त्रानुसार, हे लोक प्रत्येक नात्याला खूप गांभीर्याने घेतात. कोणत्याही कठीण परिस्थितीत ते आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत, उलट प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत भक्कमपणे, ठाम उभे राहतात.
मूलांक 8 – कोणत्याही महिन्याच्या 8,17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलाक हा 8 असतो. त्यांच्यावर शनीची कृपा असते. हे लोकं कठीण काळात त्यांच्या जोडीदाराचा हात घट्ट पकडून ठेवतात आणि कठीण परिस्थितीतही त्यांना धीर देऊन साथ देतात.
मूलांक 9 – 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. अशा लोकांवर मंगळाची विशेष कृपा असतं, असं मानलं जातं. त्यांच्या जोडीदारावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं, तर हे लोक ढालीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांचं मनोबल कमी होऊ देत नाहीत.
(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
