AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान संघात बाबर आझमची काहीच इज्जत नाही! कर्णधाराला न विचारताच घेतला निर्णय

लॉर्ड्स कसोटी सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मोठ्या खेळाडूंना थेट पाकिस्तानात पाठवलं गेलं.

पाकिस्तान संघात बाबर आझमची काहीच इज्जत नाही! कर्णधाराला न विचारताच घेतला निर्णय
पाकिस्तान संघात बाबर आझमची काहीच इज्जत नाही! कर्णधाराला न विचारताच घेतला निर्णयImage Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 08, 2026 | 8:35 PM
Share

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाची नाचक्की झाली आहे. तीन सामन्यांची कसोटी मालिका दुसऱ्या सामन्यानंतर गमावली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना औपचारिक असणार आहे. एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 9 सप्टेंबरपासून सामना होणार आहे. त्यामुळे लाज राखण्यासाठी पाकिस्तान संघ मैदानात उतरणार आहे. असं असलं तरी पाकिस्तान संघाशी निगडीत बातम्या काही संपण्याचं नाव घेत नाही. आता कर्णधार बाबर आझमने एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. बर्मिंघमममध्ये कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने एक खुलासा केला आहे. यामुळे पाकिस्तान संघ आणि बोर्डाच्या नजरेत बाबर आझमची काहीच इज्जत नसल्याचं दिसून येत आहे. बाबर आझमने खुलासा केला की, लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम बदलाच्या निर्णयाबाबत कोणतीही माहिती नव्हती.

तिसऱ्या कसोटी सामन्यात काही नव्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार हे नक्की आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला होता. मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, सलमान आगासहीत सात खेळाडूंना स्क्वॉडमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी सात नव्या खेळाडूंना इंग्लंडला पाठवलं आहे. कर्णधार बाबर आझमला याबाबत विचारलं तेव्हा त्याने स्पष्ट केलं की, यााबाबतची बातमी नंतर मिळाली. बाबर आझम पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘माझ्यासाठीही एक बातमी होती. मला याबाबत नंतरच कळलं. पीसीबीने हा निर्णय घेतला. त्यामुळे तेच याबाबत सविस्तर काय ते सांगू शकतात.’

बाबर आझमची काही इज्जत नाही…

बाबर आझमच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा पाकिस्तानी संघात कर्णधार आणि प्रशिक्षकाची काहीच इज्जत नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण संघाचे सर्व निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी खेळाडूंच्या निवडीत हस्तक्षेप करत आहेत किंवा निवड समिती थेट असे निर्णय घेत आहे. त्यामुळे कर्णधाराशी कोणतीच चर्चा होत नसल्याचं अधोरेखित होत आहे. आता बाबर आझमला बदलेल्या संघासह मैदानात उतरावं लागणार आहे. इतकंच काय तर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?