AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाच्या जमिनीपासून कमी उंचीवर घिरट्या, लोकांच्या काळजाचा चुकला ठोका, थेट शिर्डीला..

नुकताच एक धक्कादायक घटना घडली, ज्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. इंडिगोच्या विमानासोबत धक्कादायक प्रकार घडला. यानंतर नागरिकांसोबतच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

विमानाच्या जमिनीपासून कमी उंचीवर घिरट्या, लोकांच्या काळजाचा चुकला ठोका, थेट शिर्डीला..
Indigo plane
| Updated on: Mar 31, 2026 | 8:06 AM
Share

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेला निघालेल्या इंडिगोच्या विमानासोबत धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांसोबतच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यानच इंडिगोचे विमान येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आले. यासोबतच या विमानाची उंडी जमिनीपासून अत्यंत कमी असल्याने स्थानिक नागरिक घाबरले. त्यानंतर शिर्डीला न उतरवता थेट सूरतमध्ये या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण बघायला मिळाले. शिर्डीत येणाऱ्या इंडिगो विमानाला सुरक्षित सुरत विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात यादरम्यान 140 ते 150 प्रवासी होते.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण थेट इंडिगोचे विमान..

मिळालेली अधिक माहिती अशी की, इंडिगोचे IGO 619Y हे विमान दिल्लीहून शिर्डीकडे येत होते. मात्र, खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावर त्याचे लँडिंग शक्य झाले नाही. पायलटकडून अनेक प्रयत्न हे विमान लँड करण्याकरिता प्रयत्न करण्यात आले, पण कमी दृश्यमानतेमुळे पायलटला शेवटपर्यंत विमान लँड करता आले नाही.

येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच विमान होल्डवर

रात्री 8 च्या दरम्यान विमानाचे शिर्डीमध्ये लँडिंग होते. यानंतर विमानाला येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच होल्डवर ठेवण्यात आले. विमान खूप खाली उडत असल्यामुळे स्थानिक नागरिक घाबरले. बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामानात सुधारणा न झाल्याने आणि इंधनाचा विचार करून पायलटने विमान सुरतकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

विमान जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने नागरिकांनी घेतला धसका 

इंधन भरल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता विमान पुन्हा शिर्डीकडे रवाना झाले. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विमान 180 प्रवासी क्षमतेचे असून त्यात 140 ते 150 प्रवासी होते अशी माहीती मिळत आहे. यासोबतच विमानातील सर्वच प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, या घडलेल्या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले. विमान सतत हवेत कमी उंचीवर घिरट्या घालत असल्याचे दिसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात