AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नात संस्कृती जपली, महाराजांना ट्रोल करणारेही करतायेत विवाहसोहळ्यातील त्या गोष्टीचं तोंडभरून कौतुक

आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलप यांचा विवाहसोहळ्या संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नात संस्कृती जपली, महाराजांना ट्रोल करणारेही करतायेत विवाहसोहळ्यातील त्या गोष्टीचं तोंडभरून कौतुक
indurikar maharajImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 9:58 PM
Share

महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कायमच चर्चेत असतात. त्यांचं किर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीच्या साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून ते चांगलेच चर्चेमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. महाराज फक्त कीर्तनातून लोकांना लग्न साधेपणाने करा, जास्त खर्च करू नका, असे सल्ले देतात परंतु मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. दरम्यान आता इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला.  या शाही लग्न सोहळ्यावरून पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्यावर टीका सुरू झाली आहे. मात्र यावेळी या लग्न सोहळ्यात बोलताना महाराजांनी आपल्या ट्रोलर्संला सणसनीत उत्तर दिलं आहे.

इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पाडला आहे. या लग्नासाठी त्यांनी प्रचंड खर्च केला. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतात काही कमी राहु नये, याची खास काळजी यावेळी स्वत: इंदोरीकर महाराजांनी घेतली होती. तब्बल 100 एकर जागेत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र यावेळी साखर पुड्यापेक्षाही लग्नावर जास्त खर्च झाल्यानं पुन्हा एकदा महाराजांवर टीका सुरू झाली आहे.

परंतु दुसरीकडे इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीच्या लग्नात जे जेवणाचे पदार्थ ठेवले होते.  त्यावरून त्यांचे टीकाकार देखील त्यांच कौतुक करत आहेत. महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नात मराठी संस्कृती जपली आहे. त्यांनी मुलीच्या लग्नात खास मराठमोळं जेवणं ठेवलं होतं. मी माझ्या मुलीच्या लग्नात गुलाब जामून किंवा मठ्ठा ठेवला नाही असं महाराजांनी स्वत: यावेळी  सांगितलं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ