इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या शाही साखरपुड्यादरम्यान प्री वेडिंग शूटबद्दलचा तो व्हिडीओ व्हायरल, थेट म्हणाले, येढ्या बाबळीत..
इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या लेकीचा साखरपुडा काय थाटात केला आणि ते टीकेचे धनी ठरले. दुसऱ्यांना लग्न साधी करा असे प्रत्येकवेळी सांगणारे इंदुरीकर महाराज स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्यात सर्वकाही विसरले आणि थेट पैशांची मोठी उधळण केली. सध्या इंदुरीकर महराजांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा ज्या पद्धतीने महाराजांनी साखरपुडा केला, त्यानंतर ते टीकेचे धनी ठरले. पैशांची मोठी उधळण महाराजांनी केली. हे भल्ल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन सनरूफमधून बाहेर येत धमाकेदार पद्धतीने डान्स करताना महाराजांची लेक दिसली. मात्र, अशा पद्धतीने लग्नात डान्स करणाऱ्या मुलींवर अत्यंत खालच्या पातळीची टीका महाराजांनी गुड्डी म्हणत केली आणि स्वत:ची लेक तेच साखरपुड्यात करताना दिसली. महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यानंतर वारकरी संप्रदायानेही टीका केली. महाराजांचे शिष्य त्यांचे समर्थन करण्यासाठी मैदानात आली. इंदुरीकर महाराज वडिलांच्या भूमिकेत होते आणि त्यामुळे त्यांनी लेकीच्या हाैसेसाठ सर्वकाही केल्याचे त्यांच्या शिष्यांनी म्हटले.
स्वत:ची ती लक्ष्मी लोकाची ती गुड्डी म्हणत लोक त्यांना खडेबोल सुनावताना दिसत आहेत. मात्र, साखरपुड्यापेक्षाही लग्न असून शानदार करण्याची भूमिका महाराजांनी घेतली. हेच नाही तर होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी थेट र्कीतन थांबवण्याची भाषाही केली. सध्या इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली जात आहे. त्यामध्येच त्यांचा अजून एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये प्री वेडिंग शूटबद्दल बोलताना दिसत आहेत. इंदुरीकर महाराज म्हणतात की, आता एक बावळटपणा लग्नात आणलाय. राजकारणी लोक, पैशावाले लोक आणि महिलांना बारीकपणे ऐका जरा. लग्नात ते एक स्क्रीन आणलंय. त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठे शिकला हे दाखवा. ती मुलगी कुठे शिकली हे दाखवा. त्यांच्या गावातले देवूळ दाखवा..सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवा ता त्या स्क्रीनवर….
त्या पोराने आणि पोरीने लग्न जमवल्यावर कुठे एकांतात नाटकं केले, हे लोकांना दाखवता तुम्ही? त्याने ओढ्याला पळायचे… येढ्या बाबळीत मुका घ्यायचा. बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा आणि ते आम्ही बघायचे? त्याला काय म्हणतात प्री वेडिंग… त्या पोरीने पुढे पळायचे आणि त्या पोराने मागे पळायचे… आणि त्यांच्या मागे तो कॅमेरामॅन पळणार… आता काही गोष्टींसाठी दोघेच जण लागतात, असेही यावेळी त्यांनी म्हटले.
मग त्या पोरीने बोकांडी बसायचे आणि मांजरेचा मुका घ्यायचा कुत्र्याचा मुका घ्यायचा. अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं. ते वऱ्हाडी बघतात. हे हसण्यावारी गोष्टी नेऊन का, तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर अशी वागत होती, हे लोकाला दाखवता का तुम्ही? त्याचा कोर्सच निघाला आहे दोन दिवस अगोदर वड्यामध्ये डोंगरांमध्ये पळायचा. वऱ्हाड टाईट बसून पाहत, असेही इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.
