धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त : ह.भ.प. इंदुरीकर महाराज

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे म्हटलंय. (Indurikar Maharaj Dhananjay munde)

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त : ह.भ.प. इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराज आणि धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:27 AM

अहमदनगर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यानंतर आता मुंडे यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ संपत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे-रेणू शर्मा हा वाद मिटत असतानाच मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येत आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन नुकतेच संपले होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी हे वक्तव्य केले. (Indurikar Maharaj comment on Dhananjay munde)

संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे हे मंदिरात गेले होते. तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. हे समजताच धनंजय मुंडे श्रोत्यांच्या गर्दीत जाऊन बसले. ते इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकत बसले. यावेळी बोलताना धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. तसेच, संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.

माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो : तात्याराव लहाने

संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांची स्तुती करत, अडचणीच्या काळात मुंडे यांनी खूप मदत केल्याचे लहाने म्हणाले.

“राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,” अशा भावना डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति व्यक्त केल्या.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेत, माझ्यावर बलात्कार झाला नसून मुंडे यांच्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर मुंडे यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ संपले असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे कोणत्याही शहराच्या दौऱ्यावर गेले की त्यांचे जंगी स्वागत होत आहे. त्यांच्या समर्थकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला, तात्याराव लहानेंचा गौप्यस्फोट

धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक नंतर नगरमध्ये ‘वीरा’चं स्वागत !

(Indurikar Maharaj comment on Dhananjay munde)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.