AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला किती लाख लोक आले? बड्या नेत्यानेच सांगितला आकडा, म्हणाले, नुसता गर्दीचा पाऊस…

Indurikar Maharaj Daughter Wedding : इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा आज संगमनेरमध्ये पार पडला. या सोहळ्याला राज्यभरातून लोकांनी हजेरी लावली होती. आता एकूण वऱ्हाडींच्या आकड्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला किती लाख लोक आले? बड्या नेत्यानेच सांगितला आकडा, म्हणाले, नुसता गर्दीचा पाऊस...
indurikar maharaj daughter wedding PeopleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 03, 2026 | 9:53 PM
Share

प्रसिद्ध कीतनकार आणि समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा आज संगमनेरमध्ये पार पडला. या लग्नालासाठी 100 एकरावर मंडप उभारण्यात आला होता. या विवाह सोहळ्याला राज्यभरातून दिग्गज मान्यवरांसह अहिल्यानगर, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील नागरिकांनी हजेरी लावली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांसह वारकरी आणि धार्मिक क्षेत्रातील लोक या लग्नाला हजर होते. अशातच आता या लग्नाला हजर असणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या आकड्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आकडा सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला किती लोक आले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विवाह सोहळ्यात बोलताना म्हटले की, ‘इंदोरीकर महाराज अगदी सरळ सोप्या भाषेत आणि विनोदी शैलित कीर्तन करतात. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक येत आहेत. इंदोरीकर महाराज म्हणजे गर्दीचा पाऊस. या लग्नाला एक लाखांहून अधिक लोक आलेत. वारकरी परंपरा ही महाराष्ट्रात खुप मोठी परंपरा आहे. महाराज भजन-कीर्तनातून समाजप्रबोधन करतात. वारकरी संप्रदायासाठी जे जे करायचे ते काम इंदोरीकर महाराज यांनी केले आहे.

रूखवत मांडणीने वेधले लक्ष

इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीच्या शाही विवाहसोहळ्यात भव्य रूखवत मांडणी आणि पारंपारिक देखाव्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक ही पाहुण्यांसाठी खास आकर्षण ठरली आहे. विवाह जमवण्यापासून ते लग्नाच्या सर्व विधींची सुंदर सांगड घालण्यात आली. साखरपुडा, हळद, वऱ्हाडी स्वागत ते मुख्य विवाह सोहळा प्रत्येक टप्प्याचं सादरीकरण करण्यात आले. पारंपारिक वस्तू, शेतीशी निगडीत देखावे, जुन्या संस्कृतीचं दर्शनही यावेळी झाले. विविध गोडधोड पदार्थांची आकर्षक मांडणी यावेळी करण्यात आली होती. महाराष्ट्राची परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम रूखवत मांडणी आणि देखाव्यांद्वारे पहायला मिळाला. त्यामुळे हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.

विखे पाटलांनी मानले आभार

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वऱ्हाडींचे आभार मानताना म्हटले की, ‘सर्वांचे मार्गदर्शक किर्तनकार समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांच्या कन्येला आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह सर्व प्रमुख पाहुण्याचे मी आभार मानतो. वेळात वेळ काढून आपण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी धन्यवाद मानतो.’

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ