AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे बोलले ते इंदोरीकर महाराजांनी करूनच दाखवले, लेकीचा राजेशाही विवाह सोहळ्यात थेट..

किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा आज शाही विवाहसोहळा पार पडत आहे. या विवाहसोहळ्याची काही फोटो पुढे आलीत. मात्र, यादरम्यानच इंदोरीकर महाराज यांच्यावर टिकेची झोड उडाल्याचे बघायला मिळत आहे. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

जे बोलले ते इंदोरीकर महाराजांनी करूनच दाखवले, लेकीचा राजेशाही विवाह सोहळ्यात थेट..
Indurikar maharaj daughter wedding
| Updated on: May 03, 2026 | 1:13 PM
Share

इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाहसोहळा आज पार पडत आहे. तब्बल 100 एकरमध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडत आहे. मोठ्या संख्येने या लग्नात लोक दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना या विवाहसोहळ्याचे आमंत्रण आहे. गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची तयारी सुरू होती. कालच शाही पद्धतीने हळदीचा कार्यक्रम पार पडला. काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यानंतर जोरदार टीका महाराजांवर करण्यात आली. दुसऱ्यांना लग्न साधेपणाने करण्याचे महाराज सांगतात आणि स्वत: च्या मुलीच्या लग्नात महाराजांना सर्व गोष्टींचा विसर पडला म्हणते लोक जोरदार टीका करत आहेत. लग्नावर लोक मोक्कार पैसा खर्च करत असल्याचे कायमच इंदोरीकर महाराज सांगतात. लग्न अगदी साधेपणाने व्हावे, असे त्यांनी अनेकदा त्यांच्या किर्तनात बोलून दाखवले.

साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने इंदोरीकर महाराजांनी मुलीचा केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळीच इंदोरीकर महाराज यांनी म्हटले होते की, आता बघा… साखरपुड्यापेक्षा 100 पट्टीने लग्न कसे चांगले करतो पाहा.. आता इंदोरीकर महाराजांनी जे बोलले तेच करून दाखवल्याचे बोलले जात आहे. साखरपुड्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.

त्यावेळीच त्यांनी सांगितले होते की, लग्न यापेक्षा जास्त चांगले करतो… त्यांनी म्हटल्याप्रमाणेच त्यांनी हे करून दाखवले अत्यंत शाही पद्धतीने ज्ञानेश्वरीचा विवाहसोहळा आज पार पडणार आहे. या लग्नमंडपाचे काही फोटोही पुढे आली आहेत. सर्वकाही भव्य असल्याचे यावरून दिसत आहे. मात्र, इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

संगमनेर तालुक्यात हा विवाहसोहळा पार पडत आहे. मुलीच्या लग्नासोहळ्यातील काही फोटो पुढे येताच इंदोरीकर महाराज यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. आता या होणाऱ्या टीकेवर इंदोरीकर महाराज नक्की काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आज सायंकाळी हा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी