AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाला मोठी मांदियाळी, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, आज तब्बल..

इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा आहे. अत्यंत आलिशान पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. राज्यातील मोठे नेतेही या विवाहसोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाला मोठी मांदियाळी, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, आज तब्बल..
Indorikar Maharaj daughter wedding
| Updated on: May 03, 2026 | 1:39 PM
Share

इंदोरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. जय्यत तयारी या विवाहसोहळ्याची सुरू आहे. काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आज सायंकाळी हा विवाहसोहळा आहे. 100 एकरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाहसोहळा पार पडेल. 100 एकर परिसरात भव्य तयारी झाली आहे. लाखोंच्या उपस्थितीची शक्यता आहे. या शाही विवाहसोहळ्याची पत्रिकाही व्हायरल झाली. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. किर्तनपुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडणार पडेल. राज्यातील बडे नेतेही या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इंदोरीकर महाराज मुलीचा शाही विवाह करत असल्याने त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडालीये. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या शाही विवाहाचे आमंत्रण देण्यात आले. दोघेही या विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेते, संत-महंत यांची मोठ्या प्रमाणात हजेरी विवाहसोहळ्यात असेल. भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यानंतर लग्नापेक्षाही मोठी पैशांची उधळपट्टी महाराजांकडून केली जात आहे.

उपदेश एक, आचरण दुसरं? म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांना धारेवर धरले. साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचे महाराजांनी अगोदरच जाहीर केले होते. आता या शाही विवाहसोहळ्यामुळे महाराजांना पुन्हा एका लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. लग्न साधी करा असे कायमच किर्तनात इंदोरीकर महाराज सांगताना दिसतात.

इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात याचा विसर पडल्याचे बघायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीचे शाही नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आले. डेकोरेशन, पाहुण्यांची खास व्यवस्था आणि खास जेवणाचे नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आले. मात्र, इंदोरीकर महाराज लेकीच्या लग्नात पैशांची ज्या पद्धतीने उधळण करत आहेत. ते लोकांनी पचणी पडत नाहीये. मुलीच्या साखरपुड्यानंतरही इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी