AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..

इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले आहेत. याचे कारण इंदोरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा विवाहसोहळा आहे. आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा अत्यंत शाही पद्धतीने विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान आता इंदोरीकर महाराजांनी जे म्हटले ते करून दाखवल्याचे बघायला मिळतंय.

काय बोंबलायचे ते बोंबला, लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांची पैशांची मोठी उधळ, थेट राजेशाही..
Indorikar Maharaj
| Updated on: May 03, 2026 | 11:30 AM
Share

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा आज 3 मे 2026 रोजी विवाह आहे. ज्ञानेश्वरी हिचे साहिल चिलप याच्यासोबत लग्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा अत्यंत थाटात झाला. साखरपुड्यात महाराजांनी पैशांची ज्या पद्धतीने उधळण केली, त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. मात्र, या टीकेला न जुमानता इंदोरीकर महाराजांनी लेकीचे लग्नही शाही पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 100 एकरमध्ये आलिशान पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्याचन काही फोटोही व्हायरल होत आहेत. मुलीच्या शाही साखरपुड्यानंतर आता लग्नही शाही होणार आहे, हे स्पष्टच आहे. जोरदार टीका इंदोरीकर महाराज यांच्यावर होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही विवाहसोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनात साधे लग्न करण्याचा सल्ला कायमच देतात. फक्त हेच नाही तर सध्या ज्या पद्धतीने लग्नात पैशांची उधळपट्टी केली जाते, त्यावर त्यांनी नेहमीच भाष्य केले. ज्यावेळी इंदोरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यात पैशांची जी उधळपट्टी केली, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळीच इंदोरीकर महाराज यांनी म्हटले होते की, काय बोंबलायचे ते बोंबला.. लग्न तर यापेक्षा जास्त जय्यत करणार.

इंदोरीकर महाराजांनी खरोखरच त्यांचा शब्द खरा केला. साखरपुड्यापेक्षाही हा विवाहसोहळा अत्यंत आलिशान आहे. हळदीच्या कार्यक्रमाचेही खास आयोजन करण्यात आले. लग्नातील जेवणाचाही खास बेत आहे. खास पद्धतीचे डेकोरेशन लग्नात होणार आहे. राज्यातील काही मंत्रीही या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. साधेपणा आणि मुल्यांची शिकवण देणारे इंदोरीकर महाराज मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या लग्नसोहळ्यामुळे लोकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचे लग्न आज सायंकाळी गुंजाळवाडी येथे होत आहे. हळदीचा समारंभ मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर येथे काल पार पडला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी