AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मोठी बातमी, महायुतीत काय घडलं? दोन घटनांमधून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसली

Eknath Shinde : शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवसास्थानी दुष्काळ आढावा बैठक बोलवण्यात आलेली.

Eknath Shinde : मोठी बातमी, महायुतीत काय घडलं? दोन घटनांमधून एकनाथ शिंदे यांची नाराजी दिसली
Eknath Shinde
| Updated on: Oct 13, 2026 | 1:29 PM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवसास्थानी दुष्काळ आढावा बैठक बोलवण्यात आलेली. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना बोलवण्यात आलेलं. पण ते गैरहजर राहिले. आज कचरा आढावा बैठक ठेवण्यात आलेली. त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गैरहजर होते. पण त्यासाठी कारण देण्यात आलं की, त्याचवेळी नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपकडून दुर्लक्ष केलं जातय का? त्यांना जाणीवपूर्वक डावललं जातय का? एकनाथ शिंदे यांची नाराजी भाजपंकडून दूर केली जाणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

“एकूणच महायुतीत धुसफूस सुरु आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत नाराजीपेक्षा त्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जास्त व्यस्त होत्या. पण एकनाथ शिंदे यांच्या अनुषंगाने दोन-तीन गोष्टीतून त्यांची नाराजी ठळकपणे दिसून आलीय. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यापासून सातत्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची नाराजी दिसून आलेली” असं राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले.

देशात वातावरण तापलेलं आहे

“एकतर महायुतीमध्ये सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना विधान परिषदेत पुरेशा जागा मिळाल्या नाहीत हे एक कारण आहेच. पण भाजपच्या अंतर्गत असलेला एक गट बोलू लागला आहे. देशात वातावरण तापलेलं आहे. सरकारला आवाहन दिलं जाऊ शकतं असं वातावरण तयार झालय. अशावेळी भाजप अंतर्गत गट बोलू लागला आहे” याकडे संजय आवटे यांनी लक्ष वेधलं.

त्यांनी दबाव तंत्राचा वापर केलेला

“दुसरीकडे शिवसेना खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ही शिंदे यांच्यासाठी निश्चित आनंदाची बाब नाही. यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज झाल्यानंतर दरेगावला निघून गेले होते. त्यांनी दबाव तंत्राचा वापर केलेला. मी आहे असं सांगून त्यांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलेला. एकनाथ शिंदे आताही असा प्रयत्न करत असावेत पण ते महायुतीपासून दूर जातील असं वाटत नाही” असं राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?