‘आपटून आपटून चपटी होईल, पण यापुढे भाजपाचे सरकार महाराष्ट्रात कधीच येणार नाही’, कागलच्या सभेत संजय राऊतांचे आव्हान

भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आधी शिवसैनिक होते, ते परळमध्ये राहायचे. त्यांना याबाबत विचारा, असेही राऊत म्हणाले. भाजपाच्या नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देूऊ नका, काही दिवसांनी त्यांना आयसीतूत भरती करावे लागणार असल्याची टीकाही त्यांनी केली.

'आपटून आपटून चपटी होईल, पण यापुढे भाजपाचे सरकार महाराष्ट्रात कधीच येणार नाही', कागलच्या सभेत संजय राऊतांचे आव्हान
Sanjay Raut Kagal sabhaImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:47 PM

कागल– राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील  (MVA government)आमदार पडतील, असा तारखा दररोज दिल्या जात आहेत. सतत तारीख पे तारीख दिली जाते आहे, पण विरोधकांचे नशीब फुटले आहे, ते आधी बघा, असा टोला लगावत संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपावर कागलच्या सभेत जोरदार टीका केली आहे. या महाराष्ट्रात भाजपाचे सरकार (never BJP )यापुढे कधीच येणार नाही, हे आपण कागलच्या चौकात सांगतो, असेही ते म्हणाले. आपटून आपटून चपटी होईल, पण सरकार येणार नाही, अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात २०१९ पासून सरकार खेळीमेळीच्या वतावरणात सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देशात स्वाभिमान हा शब्द कागलच्या भूमीतून रुजला असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने हे राज्य सरकार काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरुन भाजपावर टीका

श्रीमंत शाहू महाराजांना आज भेटल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. ज्यांनी शिवसेनेला फसवले ते आता शिवसेनेने संभाजीराजेंना फसवले आहे असे सांगत आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. भआजपाने शब्द पाळला नाही म्हणूनच राज्याला चांगले सरकार मिळाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. श्रीमंत शाहू महाराजांनी या प्रकरणात भाष्य केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपाचे सर्व नेते गपगार झाले अशी टीका त्यांनी यावेळी केली.

भाजपाच्या राष्ट्रभक्तीत भेसळ

देशात असलेले भाजपाचे सरकार काय करीत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मिरात गेल्या ३ महिन्यात ५५ हल्ले झाले, काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली, अशा स्थितीत सरकार काय करीत आहे, असा सवाल त्यांनी केला. महागाई, बेरोजगारीवर बोलत नाहीत पण मिशीदी, ताजमहाल खोदत आहेत, अशी टीका त्यांनी केली. ताजमहाल खोदण्यापेक्षा कैलास-मानससोरवर चीनच्या ताब्यात आहे, ते आधी ताब्यात घ्या, असे आव्हान त्यांनी दिले आहे. भाजपाने ईडी, सीबीआय चीनच्या सीमेवर पाठवावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

बदनाम करण्याचे भाजपाचे राजकारण

भाजपाला, केंद्राला प्रश्न विचारतो, म्हणून ईडीस सीबीआय मागे लावतात, अशी टीका राऊतांनी केली आहे. कागलपर्यंत ईडी आली. इथे किरिट सोमय्या आले होते, ते परत कसे गेले, असा सवालही त्यांनी केला. भाजपा बदनाम करण्याचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. औरंगजेबाचे वंशज दिल्लीत काम करत आहेत, अशी टीकाही राऊतांनी केली.

चंद्रकांतदादा पाटील हे पूर्वीचे शिवसैनिक

भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा आधी शिवसैनिक होते, ते परळमध्ये राहायचे. त्यांना याबाबत विचारा, असेही राऊत म्हणाले. भाजपाच्या नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देूऊ नका, काही दिवसांनी त्यांना आयसीतूत भरती करावे लागणार असल्याची टीकाही त्यांनी केली. शरद पवारांच्या मुलीवर टीका करता, हे यांचे संस्कार, आणि हे आम्हाला शिकवतात, अशी टीका राऊत यांनी केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.