AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, हाहा:कार, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जळगावच्या पारोळा तालुक्यातील म्हसवे फाट्यावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात लोणी गावातील एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मृतांची ओळख ज्योती पाटील आणि सुधीर पाटील अशी झाली आहे. जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगावात भीषण अपघात, ऑडी आणि होंडा सिटीची समोरासमोर धडक, हाहा:कार, पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 02, 2024 | 8:51 PM
Share

जळगावच्या पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावच्या पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात लोणी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील असं मयत दाम्पत्याचे नाव आहे. अपघातातील जखमींवर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात दोन्ही महागड्या कार चक्काचूर झाल्या आहेत. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगावकडून येणाऱ्या ऑडी कारने पारोळ्यातील म्हसवे फाट्यावर वळण घेत असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ज्योती सुधीर पाटील, सुधीर देविदास पाटील जागीच ठार झाले. पाटील कुटुंब हे होंडा सिटी JJ 05 R 1247 कारने सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतहुन पारोळा तालुक्यातील लोणी बु येथे जात होते.

या दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला म्हसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणारी ऑडी क्रमांक डीडी 03 के 6906 ने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यात नाशिक येथील शिरीष लठ्ठा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना पारोळाच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. घटनेची महिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

अमरावतीतही दोन कार समोरासमोर धडकल्या

अमरावतीतही अशीच अपघाताची घटना समोर आली आहे. दोन कार एकमेकासमोर धडकल्याने या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. संबंधित घटना ही दर्यापूर-अकोला मार्गावर गोळेगाव लासुरच्या जवळ घडली. आनंद बाहकर, बंटी बिजवे आणि प्रतीक बोचे असे मृतकांचे नाव आहे. एक कार अकोला येथे जात होती. तर दुसरी कार अकोलावरून दर्यापूरकडे येत होती. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार समोर धडकल्या. या घटनेतील जखमींना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?