जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर, दिवसभरात 30 जणांना लागण, एका कुटुंबातील 16 जणांचा समावेश

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 30 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर पोहोचला आहे. (Jalgaon Corona Cases Update)

जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर, दिवसभरात 30 जणांना लागण, एका कुटुंबातील 16 जणांचा समावेश
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 5:15 PM

जळगाव : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजारवर पोहोचला (Jalgaon Corona Cases Update) आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. जळगाव जिल्ह्यात आज आणखी 30 कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 381 वर पोहोचला आहे. धक्कादायक म्हणजे वाघनगर परिसरातील कोरोनाबाधित मृत प्रौढाच्या कुटुंबातील 16 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात आज 30 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात जळगाव (Jalgaon Corona Cases Update) शहरातील 26, भुसावळ 3 आणि एरंडोलमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 381 वर पोहोचला आहे. जळगावात आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दुर्देवाने 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात 31 मेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. मात्र तरीही चोपडा तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली. चोपडा शहरात बहुतांश दुकाने उघडी असून रस्त्यावर ग्राहकांची जत्रा भरल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे तीन तेरा झाल्याचे दिसत आहे.

तर वाघनगर परिसरातील कोरोनाबाधित मृत प्रौढाच्या कुटुंबातील 16 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राजीव गांधीनगर आणि वाघनगर या परिसरातील एका कुटुंबातील बाधितांची ही सर्वाधिक संख्या आहे.

तर दुसरीकडे एका पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यातील बाधित पोलिसाची ड्युटी ही कोविड रुग्णालयाबाहेर लावण्यात आली होती. तर दुसरा बाधित हा कोविड रुग्णालयातील कर्मचारी आहे. त्यामुळे जळगाव शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 96 झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यातील खाजगी दवाखाने बंद आहे. त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे दिसून येत आहे. हे दवाखाने लवकरच सुरू करावे अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.

जळगाव महानगरपालिका इतर शहरे व ग्रामीण भागात रिक्षा आणि बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध, मेडिकल अशी सर्व दुकाने ही 11 ते 7 यावेळेत सुरू राहणार आहेत. तर इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली असून फक्त ऑनलाईन विक्री सुरू (Jalgaon Corona Cases Update) आहे.

संबंधित बातम्या 

नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा 1422 वर

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरी रस्त्यावर, नॉन रेड झोनमध्ये एसटी वाहतूक सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.