Jawan Martyred : जळगावमधील भारतीय सैन्यातील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, ड्युटीवर जात असताना घडली घटना

संपूर्ण महाराष्ट्रात 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होत असताना, निमखेड्यातील या वीरपुत्राला अपघाती वीरमरण आल्याने निमखेडी गावासह सर्वत्र जिल्ह्याभरात शोककळा पसरली आहे.

Jawan Martyred : जळगावमधील भारतीय सैन्यातील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण, ड्युटीवर जात असताना घडली घटना
जळगावमधील भारतीय सैन्यातील जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 10:17 PM

जळगाव : जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून जाताना मोटरसायकल अपघाता (Accident)त दरीत कोसळून जळगावातील भारतीय सैन्यदलातील जवानाला वीरमरण (Martyred) आले आहे. विपिन जनार्दन खर्चे असे वीरमरण आलेल्या वीरपुत्राचे नाव आहे. विपिन खर्चे (Vipin Kharche) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन बहिणी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होत असताना, निमखेड्यातील या वीरपुत्राला अपघाती वीरमरण आल्याने निमखेडी गावासह सर्वत्र जिल्ह्याभरात शोककळा पसरली आहे. खर्चे यांचे पार्थिव आज रात्री उशिरा त्यांच्या गावी आणण्यात येणार असून, उद्या सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सर्वत्र स्वातंत्र उत्सव असताना तालुक्यात दुःखद घटना

खर्चे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील नेपानगर गावचे आहेत. मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावात ते स्थायिक झाले आहेत. त्यांचे सर्व शिक्षण गावातच झाले आहे. त्यानंतर 2000 मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. गेली 22 वर्षे ते देशाची सेवा करत आहेत. भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर ते कार्यरत होते. विपिन यांचा देशसेवेचा कालावधी संपला होता. मात्र पुन्हा त्यांनी आपला कालावधी वाढवून घेतला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील या गावी नातेवाईकांच्या लग्नानिमित्त पंधरा दिवसापूर्वी आपल्या गावीही येऊन गेले. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सण दोन दिवसावर येऊन ठेपला असताना भावाला वीरमरण आल्याने दोन बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (An Indian Army soldier from Jalgaon was martyred accidentally in Jammu and Kashmir)