AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात प्रचंड राडा, पोलीस-शिवसैनिकांमध्ये झटापट, सुषमा अंधारेंचा मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेला

पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील गोंधळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

जळगावात प्रचंड राडा, पोलीस-शिवसैनिकांमध्ये झटापट, सुषमा अंधारेंचा मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेला
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 8:04 PM
Share

जळगाव : जळगावात चोपडा येथील शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेपूर्वीच गोंधळ झाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या गदारोळानंतर सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांमधून ते गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधत आहेत.

या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे देखील गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे अनेक शिवसैनिक त्यांचे चाहते झाले आहेत. पण हे शरद कोळी आता अडचणीत सापडले आहेत. कारण प्रक्षोभक भाषण करण्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या पी प्राईड हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

यावेळी पोलीस शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

या दरम्यान शिवसैनिक संतप्त झाल्याने पोलिसांसमवेत सुषमा अंधारे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ठाकरे गटाचे वक्ते पायी शहर पोलीस ठाण्याकडे निघाले.

रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.