Eknath Khadse: पाईप चोर, गुंडांना मत द्या म्हणण्याची महायुतीवर वेळ, एकनाथ खडसे यांची जहाल टीका, म्हणाले गोपीनाथ मुंडे असताना…

Eknath Khadse Criticized BJP: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा आज शांत होईल. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले खडसे?

Eknath Khadse: पाईप चोर, गुंडांना मत द्या म्हणण्याची महायुतीवर वेळ, एकनाथ खडसे यांची जहाल टीका, म्हणाले गोपीनाथ मुंडे असताना...
एकनाथ खडसेंची भाजपवर जहरी टीका
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 9:18 AM

किशोर पाटील/प्रतिनिधी: “ज्यांच्यावर गुन्हा आहे अशांना मत द्या असं महायुती म्हणायला लागली आहे, कुणी पाईप चोर आहे. कुणी जेलमधून निवडणूक लढवत आहे.” अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse On BJP) यांनी केली आहे. भाजपमधील इनकमिंगवर त्यांनी निशाणा साधला आहे. जुन्या जाणत्या नेत्यांवर कुणाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हे त्यांचं दुर्देव असल्याची टीकाही खडसेंनी केली. जुनी भाजप आणि नवीन भाजपमधील फरक अधोरेखित करताना खडसे यांनी माजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवणही ताजी केली. काय म्हणाले खडसे?

शेकडो गुंडांना उमेदवारी

माझा अर्धा आयुष्य मी भाजपमध्ये काढलं पण त्या कालखंडामध्ये एमआयएम सोबत भाजपची युती कधी नव्हती.इकडे भांडतात आणि तिकडे एमआयएम सोबत युती करतात अशी स्थित नव्हती, असे खडसे म्हणाले.इकडे पाहिलं तर सकाळी सकाळी काँग्रेस सोबत भांडतात टीका करतात आणि तिकडे अंबरनाथ मध्ये पाहिलं तर काँग्रेस सोबत युती करतात. काँग्रेसचे 12 नगरसेवक एका रात्रीत भाजपने फोडले. तर काय सरकार बनवायचे. मुंबई असेल ठाणे, नाशिक असेल त्यामुळे महानगरपालिकांमध्ये चित्र काय आहे. निष्ठांवंत कुठे गेले असा सवाल खडसेंनी केला. भाजपनं अशा शेकडो गुंडांना यांनी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला.

विरोधकांना भाजपमध्ये स्थान

परिवर्तन फक्त मतदारच करू शकतो आणि ही तुम्हाला शेवटची संधी आहे. परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेच पाहिजे. गुंडगर्दीच्या माध्यमातून नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. सातत्याने सर्वसामान्य माणसाला विकत घेण्याची भाषा महायुतीच्या माध्यमातून केली जात आहे. ज्यांना आयुष्यभर भाजपने विरोध केला तेच नगरसेवक आज भाजपमध्ये आणि त्यांनाच आज उमेदवारी दिली. जळगाव मध्ये ज्यांच्यावर आमदार सुरेश भोळे यांनी पाईप चोर असे म्हणत पुरावे दिले आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांच्याविरुद्ध रस्त्यावर आंदोलन केले आणि आज त्याच उमेदवारांचा आमदार सुरेश भोळे यांना प्रचार करावा लागतो आहे. आमदार सुरेश भोळे तुमची कीव करावीशी वाटते.एवढ्या वर्षांमध्ये मी फोडाफोडीचा राजकारण कधी पाहिलं नव्हतं. एवढं घाणेरडा राजकारण या शहरांमध्ये सुरू आहे ते तुम्ही सुद्धा अनुभवलं नव्हतं. सुरेश दादा जैन यांच्यासमोर एकनाथ खडसे असे राजकारण व्हायचे मात्र तू बसून जा हा बसून जा याच्यासाठी दादागिरी त्याच्यासाठी दादागिरी असं नव्हतं, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.

गोपीनाथ मुंडेंची आठवण

गोपीनाथ मुंडे राजकारणात असताना त्यांनी गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा केली. दाऊदसह सगळ्यांची गुंडगिरी त्यांनी मोडून काढली. आज काय परिस्थिती आहे.आज काय चित्र आहे की तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊन राहिले. त्या लोकांना तुम्ही मोठा करताय. निवडून आल्यावर लोक काय करणार आहे गुंडगिरी करणार आहे. टेंडर खाण्यासाठी मलिदा खाण्यासाठी महायुतीला महापालिका पाहिजे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.