घनदाट जंगलात कुजलेला मृतदेह सापडला, जॉ फॅक्चर क्लिप सापडली अन् मोठा कट… काय घडलं जळगावच्या गौताळा अभयारण्यात?
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घनदाड जंगलात शिर नसलेला मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी कसा छडा लावला चला जाणून घेऊया...

जवळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायगव्हान शिवारातील गट क्रमांक 75मध्ये गौताळा अभयारण्यात एक शिर नसलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरु केला आहे. नेमकं काय घडलं? मृतदेह कोणत्या व्यक्तीचा आहे या छडा पोलिसांनी कसा लावला चला जाणून घेऊया…
दातातील क्लिप्समुळे मृतदेहाची ओळख पटली
पोलिसांना तपासादरम्यान, अभयारण्यातील सनसेट पॉइंटजवळ घनदाट जंगलात शिर नसेला मृतदेह आढळलं. त्यानंतर 24 तासांच्या तापासात शिरही सापडले. जॉ फॅक्चर झाला होता. तसेच दातांना लावलेल्या क्लिप सापडल्यानंतर पोलिसांना मृत तरुणाचे नाव कळाले. निखिल हिरामण सूर्यवंशी असं खून झालेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी होता. 26 ऑगस्ट 2025 रोजी त्याचा मृतदेह उभयारण्यात सापडला होता. ग्रामीण पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबीयांची, मित्रपरिवारीची आणि शेजारच्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. सर्वजण चौकशीसाठी हजर झाले. मात्र, निखीलचा मित्र श्रावण चौकशीसाठी येण्यास तयार नव्हता. तसेच त्याच्यावर संशय आल्यने पोलिसांनी नजर ठेवली होती.
वाचा: गोरेगावमधील धक्कादायक प्रकार! आईला आवडला लेकीची BF, घरात चोरी झाली अन्… नेमकं प्रकरण काय?
मित्रानेच कशी केली हत्या जाणून घ्या
आरोपी मित्र, श्रावण ज्ञानेश्वर धनगरची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगिते की, निखिलने छत्रपती संभाजीनगर येथे मैत्रिणीला भेटायला जाऊया असे म्हणत बोलावले होते. दोघे मोटरसायकल वरून सनसेट पॉईंटपर्यंत गेले. निखिलने श्रावणला सांगितले की मी चोरी करतो, दारू पितो आणि सर्व चुकीच्या गोष्टी करतो. तुझ्यामुळे माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझ्या अडचणी दूर होतील. आज तुझा शेवटचा दिवस आहे असे तो म्हणाला. त्यानंतर निखिलने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने श्रावणवर वार केला. त्याने तो कसाबसा चुकवला आणि त्याच्या प्रायवेट पार्टवर हल्ला केला. त्यानंतर त्याने कुऱ्हाड उचलून निखीलचा शिरच्छेद केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ७ दिवस शिंदी गावात राहून सखोल चौकशी केली.
