AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात भीषण अपघाताने हाहा:कार, अंत्ययात्रेसाठी निघालेल्या गावकऱ्यांवर काळाचा घाला, महिलांचा जागीच मृत्यू, 22 जण जखमी

जळगावात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर दोन पिकअप गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झालाय. तसेच या दोन्ही गाड्यांना धडक देणाऱ्या कंटनेरचं देखील नुकसान झालंय. या अपघातात तब्बल 22 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावात भीषण अपघाताने हाहा:कार, अंत्ययात्रेसाठी निघालेल्या गावकऱ्यांवर काळाचा घाला, महिलांचा जागीच मृत्यू, 22 जण जखमी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 01, 2023 | 8:35 PM
Share

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 1 डिसेंबर 2023 : जळगाव जिल्ह्यात आज सुन्न करणारी घटना घडली आहे. पारोळा तालुक्यातील बोळे गावाचे गावकरी पिकअप गाडीमधून शिंदखेड्याच्या दिशेला जात होते. हे सर्व गावकरी अंत्ययात्रेसाठी जात होते. वाहनातील सर्वजण अंत्ययात्रेसाठी जात असल्याने गाडीतलं वातावरण शोकाकूळ होतं. बोळे गावच्या या गावकऱ्यांच्या गाडीला पारोळ्याकडून धुळेकडे जाणाऱ्या एका कंटेनरने जोराची धडक दिली. त्यामुळे मोठा अपघात झाला. हा कंटेनर आणखी एका पिकअपला धडकला. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला. रस्त्यावर जखमींच्या रक्ताचा अक्षरश: सडा पडला. अनेक जण जखमी झाले. दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटना ज्यांनी पाहिले ते प्रचंड घाबरले. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना होती. या घटनेमुळे तीन महिलांचा मृत्यू झाला. तर 22 जण गंभीररित्या जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव आणि धुळे जिल्हा हादरला आहे.

जळगावातील पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वीजखेडे गावानजिक ट्रक आणि दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. तर 22 जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज घडली. रेखाबाई गणेश कोळी (वय 55), योगिता रविंद्र पाटील (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंदनबाई नाना गिरासे (वय 50) या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेलं जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तीनही महिला या पारोळा तालुक्यातील बोळे गावाच्या राहिवासी आहेत. तर या अपघातात दोन्ही वाहनांमधील 22 जण जखमी झाले आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

पारोळ्याकडून धुळेकडे जाणाऱ्या कंटेनरवरील (क्रमांक GJ -12-BW -7254) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने अंत्यसंस्कारासाठी शिंदखेडाकडे जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. तसेच कंटेनरने दुसऱ्या आणखी एका नव्या पासिंगसाठी जाणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या वाहनातील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. या अपघातात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप

या घटनेमुळे पारोळा येथील कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते. संबंधित अपघाताचे वृत्त कळताच बोळे गावासह परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.22 जण गंभीर जखमी झालेत यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे पारोळा येथील कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते. सदर अपघाताचे वृत्त कळताच बोळे गावासह परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.

जखमींची नावे

रंजित सुरधिंग गिरासे (वय 60) भरत रामभाऊ गिरासे (वय 65) राजेराबाई सखरा कोळी (वय 45) भिमकोर सत्तरसिंग गिरासे (वय 50) भुराबाई मोनसिंग गिरासे (वय 40) भुराबाई तात्या गिरासे (वय 40) रेखाबाई अधिकार गिरासे (वय 50) नानाभाऊ सुभाष गिरासे (वय 55) भटाबाई साहेबराव गिरासे (वय 45) सुनिता नारायण गिरासे (वय 44) भुरावाई भिमसिंग गिरासे, अजतसिंग दादाभाऊ गिरासे (वय 50) न्यू पिकअप चालक, सय्यद कियाखत (मालेगांव) (वय 21) हिराबाई विजयसिंग गिरासे (वय ५०) भिमकोर बाई जगत गिरासे (वय 60) भगवानसिंग नवलसिंग गिरासे (वय 65) पिक अप चालक, रजेसिंग भारतसिंग गिरासे (वय 55) रूपसिंग नवलसिंग गिरासे (वय 60) दखाबाई रूपसिंग गिरासे (वय 55) राजेबाई साहेबराव कोळी (वय 45)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...