Jalgaon DCC: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेना विरुद्ध भाजप सामना? मुक्ताईनगरवरून मोठी रस्सीखेच, गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीला यश येणार?
Jalgaon DCC Bank Election: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांनी सध्या नाराजीचा सूर आळवला आहे. महायुतीतीच बेबनाव दिसत आहे. अर्ज भरण्यापासून ते अर्ज बाद होईपर्यंत आणि आता एक एक जागा निवडून येण्यापर्यंत टशन दिसत आहे. सहकार क्षेत्रात महायुतीतील असहकाराचीच अधिक चर्चा रंगली आहे.

Chandrakant Patil Raksha Khadse Gulbrao Patil: जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील असहकाराचीच चर्चा सध्या रंगली आहे. एकमेकांना हाबाडा देण्यासाठी महायुतीतच जुंपल्याचे दिसून येत आहे. अनेक बडे नेते सध्याच्या राजकीय समीकरण आणि गणितावर नाराज आहेत. एक एक जागा निवडून आणण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन तयारी करत असतानाच स्वपक्षातील नेतेच त्याला सुरूंग लावत असल्याने या नेत्यांसमोरील चिंता वाढली आहे. आता मुक्ताईनगरमधील वादावर यशस्वी तोडगा निघतो का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुक्ताईनगरचा तिढा, गुलाबराव पाटील मैदानात
मुक्ताईनगरचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. जळगाव जिल्हा बँकेतील मुक्ताईनगरच्या जागेवरून महायुतीत तणावाचे वातावरण आहे. माघारीची मुदत संपल्यानंतरही पेच कायम असल्याने बड्या नेत्यांसमोरील चिंता वाढली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांना बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटलांची समजूत काढण्यात गुलाबराव पाटील यांना यश येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्यात यश आल्यास थेट रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील या दोघांचे फोन वरून बोलणे करून देणार अशी माहिती समोर येत आहे.
चंद्रकांत पाटील जागेसाठी आग्रही
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या जागेवर दावा ठोकला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. भाजपने त्याग करावा आणि ही जागा शिंदे शिवसेनेला सोडावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. एकाच व्यक्तीकडे किती पदं द्यावीत असा खणखणीत सवालही त्यांनी वरिष्ठांना केला आहे. त्यांनी प्रत्यक्षरित्या रक्षा खडसे यांना टोला हाणला आहे.
काँग्रेस की भाजप कोणासोबत युती करणार?
गाव पातळीवर पक्षापेक्षा गावातली भावकी आणि जातीय समीकरणावर ही निवडणूक होत असते. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन गावाचा विकास करायचा असेल, तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढा. सर्व विचारांच्या लोकांना गावाच्या विकासासाठी एकत्रित घ्या; मात्र हे होत असताना जास्तीत जास्त शिवसेनेचे सरपंच कसे होतील, याकडे लक्ष द्या, अशा सूचना मी दिलेल्या आहेत, अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
प्रतापराव पाटील जिल्हा बँक निवडणूक माघार
प्रताप पाटील यांच्या माघारीनंतर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये रोष होता, पण शेवटी वाटाघाटीमध्ये जे ठरतं ते मान्य करावं लागतं आणि ते त्यांनी मान्य केलं. मी त्यांची समजूत काढण्याचा १०० टक्के प्रयत्न केला आहे. वेळ येईल तेव्हा संधी मिळेल, पण थोडं थांबावं लागणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले.
सुमित पाटील यांचे आमदार मंगेश चव्हाण यांना आव्हान
मी दोघांचीही समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आजही मी बोललो आहे की संयम ठेवा. शेवटी आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक हेच एकमेव उद्दिष्ट नाही. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, येणाऱ्या झेडपीच्या निवडणुका आहेत. याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर होऊ नये, यासाठी संयम पाळला पाहिजे, असा सल्ला या दोन्ही नेत्यांना गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.