AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या सराफा बाजारात चांदी सूसाट; सोने महागले, भाव आहेत असे

Jalgaon Gold Silver Rate : सुवर्णनगरी जळगावमध्ये चांदीने लांबचा पल्ला गाठला तर सोन्यात पण दरवाढ झाली. चांदीच्या दरात पुन्हा २००० रुपयांची तर सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या खिशावर यामुळे ताण आला.

जळगावच्या सराफा बाजारात चांदी सूसाट; सोने महागले, भाव आहेत असे
काय आहे सोने आणि चांदीचा भाव
| Edited By: | Updated on: May 29, 2024 | 11:17 AM
Share

सुवर्णनगरी जळगावमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीने पुन्हा तोरा मिरवला. चांदीची घौडदौड थांबता थांबेना. सोन्याने पण बाजारापेठेत कहर केला आहे. दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाला. त्यांच्या खिशावर या दरवाढीचा मोठा परिणाम झाला. त्यांना मागील आठवड्यापेक्षा जादा दामाने सोने आणि चांदी खरेदी करावे लागत आहे. मार्च, एप्रिल आणि आता मे मध्ये मौल्यवान धातूंनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. चांदी एक लाखाकडे आगेकूच करत आहे. तर सोन्याने पण मोठी मजल मारली आहे.

घसरणीनंतर पुन्हा चढाई

जळगावात गेल्या आठवड्यात वाढल्यानंतर घसरलेले सोने, चांदीचे दर पुन्हा वाढत आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे दोन हजार रुपयांनी महागली. ही दरवाढ इस्त्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे पडसाद असल्याचे व्यावसायिकांसह या क्षेत्राचा अभ्यास असलेल्या जाणकारांचे म्हणणे आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलेली आहे.

असे आहेत भाव

गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७४९०० (जीएसटीसह ७७१४७) तर चांदी ९२ हजार रुपये किलोवर गेली होती. मात्र, त्यानंतर घसरून सोमवारी चांदी ९१ हजार तर सोने ७२४०० रुपये तोळा झाले होते. मंगळवारी चांदी ९३ हजार (जीएसटीसह ९५७९०) रुपये किलो तर सोने ७२७०० रुपये तोळा झाले. ही दरवाढ इस्त्राइल हल्ल्याचा परिणाम असल्याचे चांदीचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.