
किशोर पाटील /प्रतिनिधी:जळगाव महापालिका निवडणुकीत 46 जागावर भाजपने दणदणीत विजय मिळवला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 22 जागा मिळाल्या. इतर पक्षांना इथं चुणूक दाखवता आली नाही. जळगाव महापालिकेवर (Jalgaon Municipal Corporation Election Result)भाजपची सत्ता येईल. महापालिका निकालानंतर आता बार्गेनिंगची चर्चा सुरू झाली आहे. आता विविध पदं पदरात पाडून घेताना रुसवे फुगव्याचं राजकारण विविध महापालिकेत दिसू शकते. या महापालिकेत शिंदे सेनेने या पदावर दावा ठोकला आहे. छोटा भाऊ म्हणून महापालिकेत आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केली आहे.
दोघांच्या खुर्च्या शेजारीच
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
शिवसेना शिंदे गटाचा कोणत्या पदावर दावा आहे असे विचारले असता महापौर की उपमहापौर हे दोघांच्या खुर्ची एकमेकांच्या शेजारी असतात, असं मिश्किल उत्तर भंगाळे यांनी दिले. महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदावर शिवसेना शिंदे गटाचे विष्णू भंगाळे यांनी महायुतीत छोटा भाऊ म्हणून दावा केला आहे. महापौर उपमहापौर पदाबद्दल लवकरच नेत्यांची बैठक होऊन निर्णय होईल अशी माहिती देखील जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिले आहे. महायुतीच्या विजयात आमचा देखील वाटा वाट्याप्रमाणे आम्हाला महापालिकेत पद मिळेल, याबाबतचा निर्णय महायुतीच्या नेते घेतील असं देखील जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी म्हटलं आहे. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 46, शिवसेनेच्या 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 5 अशा एकूण 69 जागांवर विजय झाला आहे.
विष्णू भंगाळे यांची फोडली चारचाकी
जळगाव शिवसेना शिंदे गटाचे विष्णू भंगाळे यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दगडाने चार चाकी च्या मागच्या काचा फोडून अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याची माहिती विष्णू भंगाळे यांनी दिली आहे. अज्ञात व्यक्तीने चार चाकीचाकीच्या फोडल्या संदर्भात विष्णू भंगाळे यांच्या वतीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीत माझा विजय झाल्याने विरोधकांना त्यांचा पराभव पचवता आला नाही, त्यातून घटना घडल्याचा आरोप विष्णू भंगाळे यांनी केला आहे. माझ्या घरापर्यंत दगड येत असतील तर मी देखील शांत बसणार नाही असा थेट इशारा देखील विष्णू भंगाळे यांनी दिला आहे.
ठाकरे गटाचा मोर्चा
जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते व महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. मतमोजणी केंद्राबाहेर फेर मतमोजणी च्या मागणीसाठी जमलेल्या जमावावर पोलीस उपधीक्षक तसेच कर्मचार्यांकडून लाठी चार्ज केल्याविरोधात आंदोलन केलं. फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावल्याने जिल्हाप्रमुख तसेच उमेदवार कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. अमानुषपणे लाठी चार्ज केल्याचा जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी आरोप करत संबंधित पोलीस उपधीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.. लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई साठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे पोलिसांनी लाठी चार्ज च्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली अहवालानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.