AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना केरळ, ना काश्मीर, जळगावात स्पेशल हाऊसबोट पर्यटन, ‘हे’ पाहिलं नाही तर काय पाहिलं?

जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक आलिशान पर्यटन स्थळ विकसित झाले आहे. येथे आलिशान हाऊसबोट्स, बेटावरील विला आणि रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे केरळ आणि काश्मीरसारखा अनुभव जळगाव जवळच मिळतो आहे. इको-टुरिझमवर आधारित हे पर्यटन स्थळ पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक आकर्षणे आणि सुविधा उपलब्ध करून देते. हाऊसबोट्समध्ये थ्री बीएचकेची सोय आहे, तर बेटावर बांबू हट आणि कोकणातील जांभा दगडापासून बनवलेले व्हिला आहेत.

ना केरळ, ना काश्मीर, जळगावात स्पेशल हाऊसबोट पर्यटन, 'हे' पाहिलं नाही तर काय पाहिलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 20, 2024 | 6:39 PM
Share

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या आलिशान हाऊसबोट, बेटावरच्या टुमदार हॉटेलचा आनंद घेण्यासाठी आता केरळ, काश्मीरला जाण्याची गरज नाही. कारण आलिशान हाऊसबोट, बेटावरच्या टुमदार हॉटेल आता जळगवापासून काही अंतरावर असलेल्या गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये साकारलं आहे. जळगावपासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गारखेडा गावाजवळ 20 ते 25 एकरावरील बेटावर जागेत शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिनी काश्मीर आणि केरळ प्रमाणेच पर्यटन क्षेत्र साकारण्यात आलं आहे.

मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबोट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबोट सोबतच बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बेटावर इको टुरिझमच्या धर्तीवर बांबू हट, बांबुचेच खुले रेस्टॉरंट, नऊ एसी हट उभारलेल्या तर कोकणातील जांभा दगडापासून फोर बीएचकेच्या तीन व्हिला या बेटावर साकारण्यात आल्या आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पेतून गारखेडा येथे हा पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे. केरळ आणि काश्मीर प्रमाणेच या ठिकाणी हाऊसबोट, बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट असून त्याद्वारे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या ठिकाणी भव्य अशी महादेवाची नंदीसह मूर्तीसुद्धा साकारण्यात आली आहे. ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गारखेडा हे जळगाव जिल्ह्यातल्या पर्यटकांनाच नव्हे तर राज्यभरातील पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावत असून पर्यटकांसाठी मोठी पर्वणी आहे.

काय-काय विशेष आहे?

गारखेडा पर्यटनस्थळाचे संचालक पंकज बिर्ला यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “हा पहिला आयर्लंड रिसोर्ट आहे, ज्यामध्ये आपण वॉटर स्पोर्ट अॅक्टिविटीज आणि राहण्यासाठी रुम्सची व्यवस्था केली आहे. हे सर्व आपण इथे उपलब्ध केले आहे. आपण चार बंगले बांधले आहेत. त्यामध्ये स्विमिंग पूलदेखील आहे. आपल्याकडे तीन हाऊसबोट आहेत. त्यात प्रत्येकी तीन रुम राहण्यासाठी आहेत. वरती एक पार्टीसाठी 1200 फुटांचा डेक आहे. या व्यतिक्त आपल्याकडे वॉटर बोट अॅक्टिविटीज आहेत. त्यामध्ये स्पीड बोट आहे, पेडल बोट्स आहे, जेट्स स्की, सफारी बोट आहे, प्लेयिंग झोन, गार्डन, जीन आहे, गार्डन आहे. एसी आणि विना एसीचे रेस्टॉरंट आहे”, अशी माहिती पंकज बिर्ला यांनी दिली.

“आपण अजून एक नवीन रेस्टॉरंट सर्वसामान्यांसाठी सुरु करत आहोत. याअगोदर तारकलीला जावं लागत होतं. तसेच केरळला पर्यटकांना जावं लागत होतं. पण आपल्या इथेही तीन मूव्हिंग हाऊसबोट आहेत. त्यामध्ये तीन रुम आहेत. त्यामुळे त्यासाठी आपल्याला केरळ किंवा काश्मीरला जाण्याची गरज नाही. तो अनुभव आपल्याला जळगावात घेता येणार आहे”, अशी माहिती देखील पंकज बिर्ला यांनी दिली.

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...