AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळात आणखी एका मंत्र्यांची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच…

Shivsena Leder Gulabrao Patil leave For Vadodari : शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील वडीगोदरीकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येताच गुलाबराव पाटील हे वडी गोद्रीला जाण्यासाठी रवाना झालेत. सरकारच्या शिष्टमंडळात ते सहभागी झालेत. वाचा सविस्तर...

ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळात आणखी एका मंत्र्यांची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच...
eknath shinde
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 22, 2024 | 2:58 PM
Share

मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. यासाठी ओबीसी आंदोलकांनी उपोषण करत आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडी गोद्री या ठिकाणी उपोषण करत आहेत. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जात आहे. 5 मंत्र्यांसह 12 जणांचं शिष्टमंडळ वडी गोद्री या ठिकाणी जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळावर हे शिष्टमंडळ दाखल झालंय. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना शिंदे गटातील मंत्री देखील सरकारच्या या शिष्टमंडळात दाखल झालेत.

शिंदेंचा फोन आला अन्…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा तातडीने जळगावहून वडीगोदरीकडे रवाना झाले आहेत. पहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील तातडीने वाहनाने वडीगोद्रीकडे रवाना झाले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ हे आज वडीगोद्री गावात जात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी गुलाबराव पाटील यांना सुद्धा फोन करून वडीगोद्री गावात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील तातडीने जळगाव येथून वडीगोद्री येथे वाहनाने रवाना झाले आहेत.

सरकारच्या शिष्टमंडळा मंडळासोबत मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा वडी गोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. वडीगोद्री येथील भेटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा सायंकाळी जळगावच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी हजर राहणार आहेत.

शिष्टमंडळ बातचित करणार

सरकारचं शिष्टमंडळच्या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर नेते या उपोषण स्थळी दाखल झालेत. सरकारचं हे शिष्टमंडळ आता ओबीसी आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे? याची माहिती हे शिष्टमंडळ देणार आहे. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी संवाद साधणार आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...