“सामनातील टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, इथं ठेवू का तिथं असं झालंय!”, गुलाबराव पाटलांचा पलटवार

सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

सामनातील टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, इथं ठेवू का तिथं असं झालंय!, गुलाबराव पाटलांचा पलटवार
आयेशा सय्यद

|

Aug 15, 2022 | 11:48 AM

जळगाव : सामनातून (Saamana) झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले आहेत. .”भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली”, असं टिकास्त्र सामनातून शिंदे गटावर डागण्यात आलं. त्यावर गुलाबराव पाटलांनी पलटवार केलाय. “खातं कुणाला कोणतं आलं, त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचं खाते वाटप झालं.  माझं पूर्वीचंच पाणीपुरवठा खातं मला मिळालं. त्यामुळे आनंद झाला आहे. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्यानं जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पुरवण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे.  गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद आहे, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

नाराजीवर चंद्रकांत पाचील म्हणतात…

नाराजी संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत, कोणीही काळजी करू नये.देशाचे नवीन शैक्षणिक धोरण मोदींनी आणलंय. त्याच्या अंमलबजावणीत करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचा आहे. देशाला चांगले इंजिनियर आहे तयार करावे लागतील. अतिशय उत्तम खात मिळालं आहे. कोणताही खातं छोटे नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते. माझ्या विभागाची सेक्रेटरी यांची बैठक होईल. आधीच्या सरकारने काय चुकीचं केल बर केलंय हे पाहणारा आहे. मी बऱ्याला बरं म्हणणारा माणूस आहे.शिवाजी विद्यापीठाला मंजूर केलेला निधी दिला नाही. साखर कारखान्यांच्या बरोबरीने रोजगार निर्माण करणार वस्त्रोद्योग हे क्षेत्र वस्त्रोद्योग सोलरवर नेता येईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें