“कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं” ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सरकारचं अपयश दाखवून दिलं

या सरकारने कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करावं ; राष्ट्रवादीच्या नेत्यानं  सरकारचं अपयश दाखवून दिलं
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 6:14 PM

जळगाव : अवकाळी आणि गारपीटाचा फटका राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना बसला आहे. मात्र सरकारकडून नुकसानभरपाईविषयी ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील मत्र्यांनी अवकाळी आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने राष्ट्र्वादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एकनाथ खडसे यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहण्यास वेळ नसल्याचे सांगत एकनाथ खडसे सरकारवर सडकून टीका केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आता त्यांच्याकडे जाण्यास वेळ नाही.

तसेच अर्थसंकल्प अधिवेशनात सुट्टीच्या वेळेस शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्र्यांना जाता येत होते मात्र त्यांना याबाबत संवेदना वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि नुकसान झालेला पहाणी रात्रीच्या अंधारात केली, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात न जाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे ,

त्या ठिकाणी जायला हवं होतं, कमीत कमी शेतकऱ्यांची अश्रू तरी पुसण्याचे काम त्यांनी करायला हवे होते मात्र तसे करण्यात आले नसल्याचे सांगत हे सरकार नाकर्ते असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.