AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : ‘प्रसाद’ मिळताच पगार कामगारांच्या हातात; मनसे स्टाईल आंदोलनाची जळगावमध्ये चर्चा, व्यवस्थापकाच्या लगावली नेत्याने कानशिलात

MNS Leader Slap Manager at Jalgaon MIDC : जळगाव एमआयडीसीमध्ये मनसे नेत्याने परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशि‍लात लगावली. एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसे स्टाईलने प्रसाद देण्यात आला.

MNS : 'प्रसाद' मिळताच पगार कामगारांच्या हातात; मनसे स्टाईल आंदोलनाची जळगावमध्ये चर्चा, व्यवस्थापकाच्या लगावली नेत्याने कानशिलात
मनसेचे जळगाव एमआयडीसीत खळखट्याक
| Updated on: Jan 17, 2025 | 5:21 PM
Share

जळगाव एमआयडीसीतील एका कंपनीत चांगलाच राडा झाला. मराठी कामगारावर वारंवार अन्याय होत असल्याने मनसेने या कंपनीत धडक दिली. त्यांनी यावेळी परप्रांतीय व्यवस्थापकाकडे जाब विचारला. त्याच्या उत्तरावर मनसे नेत्याचे समाधान झाले नाही. तर दुसरीकडे कामगारांवरील अत्याचाराचा पाढा वाचण्यात आला. त्यांचे पगार थकल्याचे समोर आले. त्यानंतर मनसे नेत्याने व्यवस्थापकाच्या कानशि‍लात लगावली. त्यावरून एकच गोंधळ उडाला.

व्हिडिओ झाला व्हायरल

जळगावमधील एमआयडीसीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या समोर आले. याविषयीचा जाब मनसे नेत्यांनी कंपनीकडे विचारला. मनसे शहराध्यक्षांनी परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

कामगारांचा पगार अडवला

कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगारांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. कामगारांचा तब्बल दोन महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी थेट कंपनीत जाऊन परप्रांतीय व्यवस्थापकाला जाब विचारत त्याचा कानशिलात लगावली.

प्रसाद मिळताच थकलेला पगार हातात

दोन महिन्यांपासून पगार देत नाही तसेच पार्सल पॅकिंग मध्ये मराठी मुलांवर चुकीचा तसेच चोरीचा आरोप करत असल्याची तक्रार कामगारांनी मनसेकडे पदाधिकार्‍यांकडे केली होती. कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगारांची अडवणूक करत असल्याचे समोर आले आहे. कामगारांचा तब्बल दोन महिन्यांपासूनचा पगार देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मनसे स्टाईलमध्ये केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकाने मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळाली आहे.

या मराठी कामगारांना पगार तत्काळ मिळावा तसेच या ठिकाणी सुरू असलेले चुकीचा प्रकार लागलीच थांबवावा या शब्दात मनसेच्या पदाधिकार्‍यांनी परप्रांतीय व्यवस्थापकाला दम भरला आहे. मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीचे मॅनेजर यांच्या कानाखाली लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याची एमआयडीसीमध्ये चर्चा रंगली आहे.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र