खडसे पुन्हा भाजपत जाणार; पण नाथाभाऊंच्या लेकीची भूमिका काय? ‘ते’ ट्विट एकदा वाचाच…

| Updated on: Apr 07, 2024 | 8:47 AM

Rohini Khadse on her Political Decision and Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी फिक्स...; पण लेक रोहिणी खडसेंची भूमिका काय? राष्ट्रवादीचे नेते, एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. मात्र या सगळ्यात त्यांच्या लेकीची भूमिका काय? वाचा सविस्तर...

खडसे पुन्हा भाजपत जाणार; पण नाथाभाऊंच्या लेकीची भूमिका काय? ते ट्विट एकदा वाचाच...
Follow us on

राज्याच्या राजकारणात स्वत:चं वेगळं वलय असणारे नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसे आता एक नवा राजकीय निर्णय घेत आहेत. ऑक्टोबर 2020 ला भाजपच्या नेतृत्वावर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर भाजपत परतण्याचा मार्ग मोकळा झाला.

रोहिणी खडसे यांची भूमिका काय?

एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपत परतण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या सगळ्यात नाथाभाऊंची लेक रोहिणी खडसे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला संघटनेचं अध्यक्षपद रोहिणी खडसे यांच्याकडे आहे. या पदावर राहत आपण काम करत राहणार असल्याचं रोहिणा खडसे म्हणाल्या आहेत.

रोहिणी खडसे यांचं ट्विट जसंच्या तसं

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.

मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …

लढ़ेंगे और जीतेंगे

खडसे पुन्हा घरवापसी करणार

एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ खडसे लवकरच पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

खडसेंचा पक्षप्रवेश कधी?

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली आहे. सुबह का भुला, शाम को घर पे वापस आ गया… बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भाजपमध्ये येतोय. त्यांच्या मूळ विचारधारेमध्ये येतोय. एकनाथ खडसे पुन्हा 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.